सकल मराठा समाजाकडे कागदपत्रे सुपूर्द 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कोल्हापूर -  पदोन्नती व सेवाज्येष्ठता याद्यांच्या माहितीची दोन हजार पानांची कागदपत्रे बिंदू नामावलीकरिता गठित समितीने सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींकडे आज सुपूर्द केली. या समितीच्या बैठकीत कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही कागदपत्रे देण्यात आली असून, प्रतिनिधी त्याचा आता अभ्यास करणार आहेत. समिती व प्रतिनिधींची 29 ऑगस्टला होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली असून, ती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. 

बिंदू नामावलीकरिता गठित समिती, सकल मराठा व मागासवर्गीय संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत पदोन्नती आणि सेवाज्येष्ठता याद्यांवरून शाब्दीक चकमक झाली होती. सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी 1997, तर मागासवर्गीय संघटनेच्या प्रतिनिधींनी 1964 पासूनच्या कागदपत्रांची मागणी केली होती. ही कागदपत्रे 20 ऑगस्टपर्यंत देण्याची मागणी केली होती. आज सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींना ती देण्यात आली. या वेळी कागदपत्रांच्या झेरॉक्‍सचे पैसे देणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला होता. त्यामुळे समितीने त्यांचा निर्णय मान्य करीत कागदपत्रे दिली. सकल मराठा समाजाचे ऍड. बाबा इंदूलकर यांनी आरक्षणाचे धोरण ठरविणाऱ्या निर्णय प्रक्रियेच्या स्पेशल सेलमध्ये 52:48 तत्त्वाचे पालन झाले आहे का, अशी विचारणा केली. त्या संदर्भातील माहिती देणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट केले. या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. राऊत, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रा. जयंत पाटील, ऍड. सतीश नलवडे, राजू लिंग्रस, बाबा पार्टे, सचिन तोडकर उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रोहम वस्तीवर राहणारे शेतकरी कैलास चत्तर यांच्या विहिरीत तीन महिन्याच...

12.42 PM

कोल्हापूर - पावसाने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल रात्रीपासून जिल्ह्यात पुन्हा दमदार हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात व...

12.18 PM

कोल्हापूर - ‘‘शहरातील खड्डे बुजविले जात नाहीत. अधिकारी निगरगट्ट आहेत. आणखी किती बळी गेल्यावर आपल्याला जाग येणार? बळी गेल्यानंतरच...

12.18 PM