शिवराज्याभिषेक सोहळ्यास जाण्यास बादल घोडा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

कोल्हापूर : रायगडचा आकर्षण बनलेला बादल घोडा यंदा सलग सहाव्यांदा शिवराज्याभिषेक सोहळ्यास जाण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला तीन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, यळगूडमधील संजय बागल त्याला घेऊन उद्या (ता. 4) रवाना होत आहेत.

काटेवाडी (शामकर्ण) जातीचा बादल नृसिंहवाडी येथून 2008ला श्री. बागल यांनी खरेदी केला. बागल यांना प्राण्यांची आवड असल्याने एखादा प्राणी, पक्षी जखमी झाला, की त्याची देखभालही ते करतात. घोडे स्वारीच्या आवडीतून त्यांनी बागलला खरेदी केले. तत्पूर्वी तो पंधरा जणांकडे होता. त्याचे वय वीस वर्षे असून, तो सलग सहाव्यांदा रायगडावर जाणार आहे. अर्ध्या तासात गड चढणारा बादल शिवभक्‍त्तांचे आकर्षण बनला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याला जाण्यासाठी त्याच्याकडून पायऱ्यावरून चढ-उतारासह पोहण्याचा व्यायाम करून घेतला आहे. त्याला कडबाकुट्टी, गहू, भुसा, दूध, अंडी, सातू असा खुराकही दिला असून, बागल यांची मुलगी प्राजक्‍त्ता ही शिवराज्याभिषेकावेळी बादलवर स्वार होण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवराज्याभिषेकानंतर शिवभक्‍त्तांची गड उतारण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेत बागल हे बादलला दुसऱ्या दिवशी गड उतरणार आहेत.