कोल्हापूरच्या पंचगंगेत आढळले हजारो मृत मासे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले आहे. नदीच्या पात्रात परिसरातून येणारे बारा अत्यंत विषारी नाले मिसळल्याने मासे मृत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले आहे. नदीच्या पात्रात परिसरातून येणारे बारा अत्यंत विषारी नाले मिसळल्याने मासे मृत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पंचगंगा नदीच्या पात्रात कोल्हापूर परिसरातील जवळपास बारा अत्यंत विषारी नाले मिसळले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील साखर कारखान्यांमधून येणारे रासायनिक द्रव सातत्याने नदीत मिसळून ही संपूर्ण नदी विषमय झालेली असल्याचे आज (शनिवार) आढळून आले आहे. पंचगंगेचे पात्र असलेले बावडा येथील राजाराम बंधारा पूर्णपणे दूषित झाल्याने पात्रातील हजारो मासे मृत झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हेच मृत विषारी मासे आज शाहू मार्केटयार्डासह अन्य ठिकाणी विक्रीसाठी आले आहेत.