माजी आमदार बाबूराव धारवाडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाबूराव धारवाडे (वय 87) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. शास्त्रीनगर परिसरातील जागृती कॉलनी येथून उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाबूराव धारवाडे (वय 87) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. शास्त्रीनगर परिसरातील जागृती कॉलनी येथून उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.

दोन पंतप्रधान, सहा मुख्यमंत्री तसेच यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी लहानपणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. (कै.) बाळासाहेब खर्डेकर, प्रा. एम. आर. देसाई यांच्या मदतीने त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी 1942 ते 46 पर्यंत कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी संघाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत काम केले. कोल्हापुरात 1968 ते 1972 या काळात जनसेना संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलनांत सहभाग घेतला. कोल्हापूर नगरपालिकेतील भ्रष्टाचार, संभाजी पूल प्रकरण, महागाईविरोधी आंदोलन, सीमा चळवळीतील सहभाग यात ते आघाडीवर होते. कोल्हापुरात शेकापचे वर्चस्व असतानाच्या काळात, त्यांनी कॉंग्रेसतर्फे सामान्यांच्या नागरी प्रश्‍नांसाठी चळवळी उभारून पक्षाची संघटनात्मक बांधणी केली होती.