शिये खाणीत मायलेकाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नागाव - शिये (ता. करवीर) येथील वन विभागाच्या खाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाला. सौ. सविता अप्पासाहेब बेदगिरी (वय २६, रा. बार कारदगा, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) व त्यांचा मुलगा आरव (५) अशी मृतांची नावे आहेत. ही दुर्घटना सकाळी साडेदहाला घडली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : अप्पासाहेब पत्नी सविता व मुलगा आरव यांना घेऊन दोन दिवसांपूर्वी शिये पैकी विठ्ठलनगर येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे पाहुणे म्हणून आले होते. ते येथे रोजगार शोधत होते. 

सविताचा भाऊ शिये येथील एका क्रशरवर कामाला आहे. त्याचा विवाह ठरवायचा असल्याने सविता येथे राहणार होती. आज सकाळी आप्पासाहेब औषध आणण्यासाठी गेले होते. त्यानंतर सविता कपडे धुण्यासाठी वन विभागाच्या खाणीत निघाल्या. आरव त्यांचासोबत गेला. सविता कपडे धुत असताना आरव खेळत होता. खेळता खेळता तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी सविताने पाण्यात उडी मारली.

आरवला वाचविण्याचा तिचा प्रयत्न अपयशी ठरला. पाण्यात बुडून सविताचा मृत्यू झाला. तेथे कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी याबाबत आप्पासाहेब यांना माहिती दिली. त्यानंतर दोघांनाही पाण्यातून बाहेर काढण्यात आले. आरवची सूक्ष्म हालचाल होती. त्याला तत्काळ कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूवी त्याचाही मृत्यू झाला. आप्पासाहेब यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. सहायक फौजदार घोलराखे तपास करत आहेत.

Web Title: Kolhapur News Mother and girl death in Shiye Mines