पासिंग नसणारी वाहने वर्कशॉपच्या बाहेर सोडू नका - कोल्हापूर मनपा आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  महापालिकेच्या वर्कशॉप विभागातील पासिंग न झालेली वाहने आज सुभाष स्टोअर्स या वर्कशॉपच्या बाहेर सोडू नयेत, असे आदेश आयुक्तांनी दिले. त्यामुळे पासिंग न झालेली वाहने आज वर्कशॉपमध्येच थांबवून ठेवण्यात आली.

पाण्याचे र्टॅकर, कचरा वाहतूक करणारे डंपर, मैला सक्‍शन करणारी वाहने यांचा यामध्ये समावेश आहे. ही वाहने महापालिका शहरवासियांना देत असलेल्या सेवा सुविधांसाठीच रस्त्यावर असतात. परंतु पासिंग न करता वाहन चालविणे चुकीचे असल्याने आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच वर्कशॉपमधील कोणतेही वाहन खराब,नादुरुस्त असल्यास संबधित वाहनचालकाने असे वाहन दुरुस्तीसाठी तात्काळ वर्कशॉपमध्ये आणायचे आहे. तसेच वाहनाच्या कागदपत्रांच्या सर्व छायाकिंत प्रतीही वाहनासोबतच गाडीमध्ये समाविष्ट करायला हवीत, असेही या आदेशात म्हंटले आहे.

आयुक्तांच्या या आदेशामुळे शहरातील सेवा, सुविधा पुरविण्यात एक-दोन दिवस खंड पडणार असला तरी देखील रस्त्यावर अधिक जोखीम न घेता वाहने सुरक्षीत प्रवास करावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या वाहनांचे अपघात झाले, तर महापालिका प्रशासनावर त्याचे खापर फोडले जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.