महापालिका विकत घेणार प्लास्टिक आणि ई-कचरा

लुमाकांत नलवडे
रविवार, 23 जुलै 2017

कोल्हापूर - तुमच्या घरातील प्लास्टिक आणि ई-कचरा महापालिका विकत घेणार आहे. यासाठी शहरात चार ठिकाणी प्लास्टिक सेंटर उभारण्यात येतील. घरातील प्लास्टिक कचरा या सेंटरमध्ये एकत्रित केला जाणार आहे.

यामुळे शहर प्लास्टिकमुक्त करण्यास मदत होईल. रोटरी करवीर क्‍लब आणि कोल्हापूर महापालिका यांच्यातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जमा झालेला कचरा एकत्रित करून तो रिसायकल केला जाईल.

कोल्हापूर - तुमच्या घरातील प्लास्टिक आणि ई-कचरा महापालिका विकत घेणार आहे. यासाठी शहरात चार ठिकाणी प्लास्टिक सेंटर उभारण्यात येतील. घरातील प्लास्टिक कचरा या सेंटरमध्ये एकत्रित केला जाणार आहे.

यामुळे शहर प्लास्टिकमुक्त करण्यास मदत होईल. रोटरी करवीर क्‍लब आणि कोल्हापूर महापालिका यांच्यातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जमा झालेला कचरा एकत्रित करून तो रिसायकल केला जाईल.

रोज सुमारे हजार टन प्लास्टिक आणि ई-कचरा जमा होत असल्याची माहिती ‘रोटरी करवीर’च्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी सुरू केलेल्या ई-कचरा मोहिमेतून ही आकडेवारी पुढे आली. शाळांतील विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी एक दिवस ई-कचरा गोळा करण्याचे काम केले. ई-कचरा आणि प्लास्टिक यांची विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेचे आहे. ते सध्या होत नाही. त्यामुळे ‘रोटरी करवीर’च्या पुढाकारातून महापालिकेने चार प्रभागांत प्लास्टिक सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्‍यक सर्व बाबींची पूर्तता रोटरी क्‍लब करणार आहे. महापालिका जागा आणि आवश्‍यक तेथे कर्मचारी उपलब्ध करून देणार आहे. याची सुरवात उद्या (ता. २३) प्रभाग क्रमांक तीन आणि आठमध्ये होत आहे. 

रोटरी क्‍लब ऑफ करवीर, रोटरी करवीर चॅरिटेबल ट्रस्ट, शिक्षण उपसंचालक विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका यांचेही या उपक्रमाला सहकार्य आहे.

प्लास्टिक सेंटर उभारणार
महापालिकेतर्फे चार ठिकाणी प्लास्टिक सेंटर उभे केले जाणार आहेत. नागरिकांनी घरातील प्लास्टिक आणि ई-कचरा या सेंटरमध्ये विक्री करायचा आहे. यानंतर सर्व कचरा एकत्रित करून रि-सायकलिंगसाठी पाठविला जाईल. यासाठी आवश्‍यक सर्व खर्च आणि जमा करण्याचे काम रोटरी क्‍लबकडून केले जाईल. आवश्‍यक तेथे कर्मचारी आणि जागा महापालिका देणार असल्याचे ‘रोटरी’चे एस. एन. पाटील आणि प्रमोद चौगुले यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
  
१७ प्रकारचा प्लास्टिक कचरा -
चिप्स व मिठाई दुकानातील पॅकिंग- ८.६ टक्के
बाटल्यांचे तुकडे व टोपण- ११.९ टक्के
पीईटी बाटल्या (पोलो इथिलीन टेरिपॅप्लेट) ः १०.० टक्के
सुपर मार्केट, रिटेल्सकडील पिशव्या- ७.४ टक्के
स्ट्रॉज- ७ टक्के
कचरा टाकावयाच्या पिशव्या- ६.७ टक्के
पॅकेजिंग मटेरियल- ६.७ टक्के
फूड पॅकेजिंग पिशव्या- ५.२ टक्के
क्‍लिंग रॅपिंग (पाइप्स, खेळणी वगैरे)- ४ टक्के
फळांच्या ज्यूसच्या बाटल्या- ३.४ टक्के
पाण्याच्या व सॉफ्ट ड्रिंक्‍सच्या बाटल्या- २.६ टक्के
कप, मग- २ टक्के
फूड कंटेनर्स- १.७ टक्के 
दुधाच्या बाटल्या- १.६ टक्के
सिगारेट लायटर्स- १.२ टक्के
इतर वापर- ५.५ टक्के
सिंक्‍स पॅक रिंग्स (सॉफ्टड्रिंक्‍स कॅन्स एकत्रित पॅकिंग) ः १.४ टक्के
(शंभर टक्के प्लास्टिक कचऱ्याची अशी विभागणी होते.)