हेल्मेटबाबत प्रबोधनाचा एक अनोखा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - हेल्मेटसक्ती करावी की न करावी, हा भाग अलाहिदा. मात्र, ‘हेल्मेट - सक्ती नव्हे गरज’ असून, त्याबाबतच्या प्रबोधनासाठी शाहूपुरीतील उषा टॉकीजच्या पिछाडीस असलेल्या त्रिमूर्ती गणेश मंडळाने यंदा ‘व्हीलचेअर’ देखावा साकारला. आता हा देखावा पाहिलेल्या शंभर जणांना मंडळ मोफत हेल्मेट देणार असून, त्याचा मुख्य सोहळा उद्या (ता. १०) सायंकाळी साडेपाच वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.   

नेहमीच सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या मंडळाने हेल्मेट ही सक्ती न मानता ती एक गरज म्हणून आपण त्याचा वापर केला पाहिजे, असा मौलिक संदेश देखाव्यातून दिला. प्रबोधनपर फलकांसह सजीव देखाव्यातून हा विषय अधिक गांभीर्याने मांडताना घडलेले अपघात आणि त्यातून होरपळलेल्या विविध कुटुंबांची माहितीही सर्वांना दिली. साहजिकच हा देखावा पाहायला कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली. 
 
केवळ देखावा सादर केला म्हणजे आपले काम संपत नाही. त्यामुळे पुढे काही तरी कृतिशील पाऊलही टाकले पाहिजे, ही या मंडळातील तरुण कार्यकर्त्यांची भावना. त्याचाच एक भाग म्हणून देखावे पाहायला येणाऱ्यांनी वहीत अभिप्राय लिहावेत. त्यातील सर्वोत्कृष्ट अभिप्राय देणाऱ्यांना मोफत हेल्मेट देण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या कुवतीनुसार किती हेल्मेट द्यायचा हा आकडा त्यांनी सुरवातीला ठरवला नाही. मात्र, अभिप्रायच इतके आले की या वह्या पोत्यात भरून मंडळाला ठेवाव्या लागल्या. त्यातून सर्वोत्कृष्ट शंभर अभिप्राय लकी ड्रॉ पद्धतीने मंडळाने निवडले आणि त्याची माहितीही संबंधितांना कळवली. आता त्याचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, विद्याप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांचीही प्रमुख उपस्थिती असेल.

Web Title: kolhapur news new experiment for helmet