कोल्हापूरात ३६ हेक्टरवर ऑक्‍सिजन पार्क

बी. डी. चेचर
रविवार, 27 मे 2018

कोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८ प्रकारच्या झाडांची लोकसहभागातून लागवड करण्याचे नियोजन आहे. यामुळे या परिसरात हिरवाई व पुरेसा प्राणवायू निर्माण होण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर - येथील शेंडा पार्क परिसरात नव्याने ऑक्‍सिजन पार्कची निर्मिती होणार आहे. ३६ हेक्‍टर जमिनीवर ४० हजार फुले, फळे, औषधी वनस्पती आदी २८ प्रकारच्या झाडांची लोकसहभागातून लागवड करण्याचे नियोजन आहे. यामुळे या परिसरात हिरवाई व पुरेसा प्राणवायू निर्माण होण्यास मदत होणार आहे.

हा पार्क भविष्यात पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. कृषी महाविद्यालय व सामाजिक वनीकरणतर्फे हा पार्क साकारणार आहे. यासाठी १ कोटी ७८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. १ जूनला याची सुरवात होणार आहे.

लागवड होणाऱ्या वनस्पती

 लक्ष्मीतरू  गूळभेंडी  वडचेरी  रुद्राक्ष  भद्राक्ष  बकूळ  पिवळा चाफा  मोहगली  जांभूळ  आंबा  काजू   फणस  कोकम  चिंच  आवळा  कवट  बेल  सीताफळ  रामफळ  पेरू  जायफळ  लवंग  तमालपत्री  दालचिनी  मोहरी 

सामाजिक वनीकरणातर्फे संवर्धन
झाडांची लागवड केल्यानंतर त्यांचे संवर्धन करण्याचे काम सामाजिक वनीकरण विभाग करणार आहे. यात झाडांची सर्व प्रकारची काळजी घेऊन वाढीसाठी प्रयत्न होईल. तीन वर्षांनंतर ही झाडे कृषी महाविद्यालयास हस्तांतरित केली जातील. याचा सामजस्य करार दोघांत झाला आहे. झाडांच्या लागवडीसाठीची तयारी पूर्ण झाली असून, जागेचे माती परीक्षणही झाले आहे. यानुसार खत व पाण्याचे व्यवस्थापन होणार आहे. याचे व्यवस्थापन करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. खोत, वनविभागाचे अधिकारी एन. व्ही. शिंदे, वनपाल एस. आर. शेळके परिश्रम घेत आहेत. 

राज्यातील पहिला ऑक्‍सिजन पार्क असल्याचा आमचा दावा आहे. या पार्कमुळे शहर व परिसरातील नागरिकांना वनराईचा अनुभव मिळणार आहे. हा पार्क झाल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. बाहेरील पर्यटकांनाही या पार्कमध्ये येण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. 
-डी. पी. खाडे,
डी. एफ. ओ, सोशल फॉरेस्ट.

असा असेल पार्क 

  •  एकूण वृक्ष लागवड - 40 हजार
  •  1 कोटी 78 लाख खर्च 
  •  1 जूनला होणार सुरूवात
  •  6 ते 7 फुटाची झाडांची लागवड
  •  कृषी महाविद्यालयाचे 500 विद्यार्थी सहभागी
Web Title: Kolhapur News Oxygen Park in Kolhapur