‘बदल्या रद्द’साठी ग्रामविकास मंत्र्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

महिला शिक्षकांनी घेतली पंकजा मुंडेंची परळीत भेट; स्थगिती देण्याचे आश्‍वासन

कोल्हापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना चालू वर्षी स्थगिती देण्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षक संघटना समन्वय समितीला दिले. महिला शिक्षकांनी मंत्री मुंडे यांची परळी (जि. बीड) येथे भेट घेऊन बदल्यांना स्थगिती देण्याची आग्रही मागणी केली.
यावर्षी शिक्षकांच्या बदल्या अवघड व सर्वसाधारण अशा दोनच क्षेत्रात करण्याचे नवे धोरण ग्रामविकास विभागाने आखले होते. या धोरणास शिक्षक संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. 

ऑनलाईन बदली अर्ज करताना अनेक अडचणी येत आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पंधरा दिवस झाले. पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या यावर्षी बदल्या करू नयेत, अशी जोरदार मागणी करत महिला शिक्षकांनी बदली धोरणातील त्रुटीही मंत्री  मुंडे  यांना दाखवून दिल्या. 

पुढील आठवड्यात मुंबईत गेल्यानंतर शिक्षकांच्या बदल्यांबाबत निर्णय  घेण्याचे आश्‍वासन या वेळी त्यांनी दिले. 

या वेळी राजाराम वरुटे, मधुकर काटोळे, नामदेव रेपे, सुरेश कोळी, सतीश बरगे, जयवंत पाटील, शिवानंद भरले, दिलीप ढाकणे, पुष्पा दौड, सुषमा राऊ तमारे, अर्चना पथरीकर, स्वाती महाजन, रेखा मोरे, कामिनी शिलवंत यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

याचिका सुनावणी ७ जुलैला
मुंबई उच्च न्यालयात बदली धोरणाविरोधात अनेक शिक्षकांनी याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांची सुनावणी आता ७ जुलै रोजी होणार आहे.

मुंडेंकडे सतत मागणी 
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे गेल्या तीन दिवसांपासून स्वतःच्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षक नेते, कार्यकर्ते व शिक्षकांनी मंत्री मुंडे जेथे असतील तेथे त्यांची भेट घेऊन बदल्यांना स्थगिती देण्यासाठी साकडे घातले.