शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा - शेकापची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

कोल्हापूर - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन, त्यांचा सात बारा कोरा करा, शेतमालाला उत्पादन खर्च 50 टक्के अधिक वाढावा असा हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची लागू करा, आदी मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात शेतकरी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

कोल्हापूर - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन, त्यांचा सात बारा कोरा करा, शेतमालाला उत्पादन खर्च 50 टक्के अधिक वाढावा असा हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची लागू करा, आदी मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात शेतकरी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपानंतर शासनाने दीड लाख रुपयापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊन आज सहा महिने होत आले. कर्जमाफीची अंमलबजावणी सुरु आहे. कांहीना कर्जमाफी मिळत असल्याचे शासन आकडेवारीसह सांगत असले तरी प्रत्यक्षात बॅंकाकडून माहीती घेता, अद्याप कोणाही शेतकऱ्यास त्याचा लाभ झाल्याचे दिसून येत नाही. यामधील जाचक अटी, सातत्याने नियमामध्ये होणारे बदल यामुळे ही कर्जमाफी ही ऐतिहासिक फसवणूक ठरत आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपत्र अनुदान मिळण्यासाठी 31 जुलै 2017 पर्यंत कर्जफेड करण्याच्या अटीमुळे असे शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. ही सवलत म्हंणजे प्रोत्साहन अनुदानाच्या नावाने हमखास कर्ज वसुलीची योजना आहे. भाजप सरकारने केंद्रात व राज्यात सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करुन सातबारा कोरा करणार व शेती मालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के हमी भाव मिळण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करायचे आश्‍वासन दिले होते. पंरतु गेल्या वर्षात केंद्राची व राज्याची सत्ता ताब्यात असूनही निव्वळ घोषणांच्या पलिकडे आज अखेर कांहीही झालेले नाही. यामुळेच गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कमी होण्याऐवजी वाढत असून त्यामध्ये त्यांच्या मुलीच्या होणाऱ्या आत्महत्या या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या शासनाला नामुष्कीजनक आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीतून बाहेर फेकला जात असून परिणामी भविष्यात उत्पादन घटण्याची अवस्था शेतीप्रधान देशावर येईल, असे या निवेदनात म्हंटले आहे. 

आंदोलनामध्ये माजी आमदार संपतबापू पाटील, भारत पाटील, दत्तात्रय पाटील, बाबुराव कदम, केरबा पाटील, अशोकराव पवार पाटील, जनार्दन जाधव, शिवाजी साळुंखे, अंबाजी पाटील, वसंत कांबळे, संतराम पाटील, सुभाष झेंडे, गोपाळ पाटील, चंद्रकांत बागडी, बाबासाहेब देवकर, अमित कांबळे, सरदार पाटील, सुशांत बोरगे, एकनाथ पाटील, स्वप्निल पाटोळे आदींचा सहभाग होता.  

Web Title: Kolhapur News peasants and workers party of India agitation