पेट्रोलला "कराने' घेरले 

सुनील पाटील
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - पेट्रोलवर सरचार्ज तीन रुपये, दारूबंदीमुळे न मिळणारा; पण पेट्रोलमधून वसूल केला जाणारा कर दोन रुपये आणि दुष्काळ निवारणासाठी घेतले जाणारे दोन रुपये, तसेच इतर कर तीन रुपये असा प्रतिलिटर एकूण दहा रुपयांचा पेट्रोलवर कर आकारून ग्राहकांचा खिसा मारला जात आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेते 7 ते 14 रुपये महाग पेट्रोल महाराष्ट्रात विक्री केले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर आकारणी सुरू असताना कोणताही पक्ष, संघटना किंवा विरोधी पक्षातील लोक याचा जाब विचारायला तयार नाहीत. 

देशात सर्वाधिक महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळते. याउलट कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा सात रुपये कमी दराने पेट्रोल मिळत आहे. राज्यातील दारू दुकाने बंद झाल्याने दारूपासून मिळणारा महसूल बुडाल्याचे कारण पुढे करून प्रतिलिटर पेट्रोलवर दोन रुपये कर आकारणी सुरू करण्यात आली. यापूर्वी राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतीसह अनेकांचे नुकसान झाले. या वेळी दुष्काळ निवारण कर म्हणून प्रतिलिटर दोन रुपये आकारणी केली जात होती. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला, तरीही या दुष्काळ निवारण कराचे नाव बदलून ग्राहकांकडून प्रतिलिटर दोन रुपये कर वसूल केला जात आहे. दारूबंदीपूर्वी सरचार्ज आणि इतर कर म्हणून प्रतिलिटर सहा रुपये वाढविले होते. त्यानंतर दारूबंदी झाली आणि महसूल बुडाला म्हणून प्रतिलिटर पेट्रोलवर दोन रुपयांचा बोजा टाकण्यात आला. यामुळे दर आणखी वाढण्यास मदत झाली. दुष्काळ कर रद्द करावा, म्हणून पेट्रोल-डिझेल असोसिएशनसह विविध संघटनांनी आंदोलन करून निवेदन दिले होते. मात्र, याचा कोणताही परिणाम शासनावर झालेला नाही. कोण विचारायला येत नाही, म्हणून करावर कर लावले जात आहेत. एकीकडे पेट्रोलचे दर दिवसागणिक वाढत असताना शासनही विविध कर आकारून ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारत आहे. देशात गोव्यात सर्वांत स्वस्त म्हणजे प्रतिलिटर 64.63 रुपये दर आहे; तर कर्नाटकमध्ये 71 रुपये दर आहे. पेट्रोलसाठी सर्वांत महाग राष्ट्र म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. 

तीन रुपये सरचार्ज 
महाराष्ट्र शासनाने प्रतिलिटर तीन रुपये सरचार्ज लावला आहे. याच सरचार्जच्या आधारे शासनाला 2017-18 मध्ये अतिरिक्त एक हजार कोटींचा महसूल मिळणार आहे. 

7 ते 14 रुपयांचा फरक 
महाराष्ट्रात 10 सप्टेंबरला प्रतिलिटर पेट्रोलचा दर 79.28 रुपये आहे. या तुलनेते इतर राज्यांतील दर महाराष्ट्रापेक्षा 7 ते 14 रुपयांनी कमी आहेत. 

राज्य पेट्रोल दर महाराष्ट्रापेक्षा कमी असणार दर 
गोवा* 64.63* 14.63 रुपये 
दिल्ली* 70.17* 9.11 रुपये 
हरियाना* 70.32* 8.96 रुपये 
गुजरात* 71.97* 7.31 रुपये 
चेन्नई* 72.75* 6.53 रुपये 

Web Title: kolhapur news petrol tax