कोल्हापुरात मटका अड्ड्यावर सांगली पोलिसांचा छापा

कोल्हापुरात मटका अड्ड्यावर सांगली पोलिसांचा छापा

कोल्हापूर - टेंबलाई रेल्वे फाटक परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर शनिवारी रात्री सांगलीतील पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी अशोक अण्णाप्पा गोटुरे (५६, टेंबलाई रेल्वे फाटक), तसेच सुरेश रघुनाथ पाटील (५७, रा. टेंबलाई फाटक) यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. 

जिल्ह्यातील मटका, जुगार अड्डे सुरू असूनही स्थानिक पोलिस निरीक्षकांचा कानाडोळा असतो. यामुळेच विशेष पोलिस महानिरीक्षकांनी नेमलेल्या खास पथकाकडून काल शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यावर छापा टाकून दोघांना अटक केली. कोल्हापूर परिक्षेत्रातील हे पथक असून ज्या ठिकाणी अवैध धंदे बंद होत नाहीत, तेथे हे पथक कारवाई करते. एक सहायक पोलिस निरीक्षक, एक महिला उपनिरीक्षक आणि पाच कर्मचारी या पथकात आहेत. त्यांच्याकडून ही कारवाई झाली आहे. फिर्याद मात्र शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या नावे दाखल झाली आहे. सांगलीतील पोलिस पथकाने ही कारवाई केल्यामुळे शहरातील पोलिसांचा नाकर्तेपणा  उघड झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com