पोलिसांसमोर डॉल्बी भिंतींची उभारणी... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - विसर्जन मिरवणूक तुमची; आगमनाची मिरवणूक आमची... या ईर्षेने राजारामपुरीत डॉल्बी लावण्याची तयारी आजपासून सुरू झाली. पोलिसांसमोरच डॉल्बीच्या भिंती उभारल्या जात असल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले. राजारामपुरीतील उद्याच्या (ता. 25) आगमन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट रोखण्यात पोलिस पास होणार की नापास याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

कोल्हापूर - विसर्जन मिरवणूक तुमची; आगमनाची मिरवणूक आमची... या ईर्षेने राजारामपुरीत डॉल्बी लावण्याची तयारी आजपासून सुरू झाली. पोलिसांसमोरच डॉल्बीच्या भिंती उभारल्या जात असल्याचे चित्र आज पाहावयास मिळाले. राजारामपुरीतील उद्याच्या (ता. 25) आगमन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट रोखण्यात पोलिस पास होणार की नापास याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करण्याचा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलिस अधीक्षकांना त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनीही "डॉल्बी लावला तर याद राखा...' अशा पद्धतीचा इशारा तालीम मंडळांना दिला होता. पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थिती लावणारी कायमचीच मंडळे सोडली तर डॉल्बी लावणाऱ्या मंडळांनी पाठ फिरवली. 

राजारामपुरीतील मंडळे आगमन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करतात. नेते मंडळींना उद्‌घाटनाला बोलवून मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट करण्याचा यशस्वी प्रयत्न यापूर्वी येथील मंडळांकडून केला गेला आहे. पोलिसांचे डॉल्बीबाबतचे आदेश धुडकावून येथील काही मंडळांनी डॉल्बी लावण्याची तयारी आजपासूनच सुरू केली. ट्रॅक्‍टरवर सिस्टीमच्या भिंती उभारण्याचे काम कार्यकर्ते करत होते. हा प्रकार बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांसमोरच सुरू होता. एक - दोन मंडळांचे कार्यकर्ते जनता बझार चौकातच सिस्टीम जोडलेले ट्रॅक्‍टर नंबरासाठी उभे करण्याचे प्रयत्न करत होते. राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा डॉल्बी लावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याची परीक्षा पोलिसांना द्यावी लागणार आहे. त्याशिवाय विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त होणार नाही. काही मंडळांनी आजच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यातील मोजक्‍या मंडळांच्या मिरवणुका मात्र थेट डॉल्बीच्या दणदणाटात शहरातून निघाल्या होत्या. 

उत्सवासाठी बाहेरील जिल्ह्यातून पोलिस बंदोबस्त मागविला जाणार आहे. त्यापूर्वी गुंडांना हद्दपार करणार, वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणार, डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर जागेवर कारवाई करणार, अवैध धंदे मोडून काढणार, गस्त वाढवणार असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आले. अद्याप कोणाला जिल्ह्यातून हद्दपार केले, कोणत्या फाळकूट दादांवर कारवाई केली हे गुलदस्त्यातच आहे. 

शहरात वाहतुकीची कोंडी... 
सकाळपासून शहरातील सर्व प्रमुख चौकांत वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. अपवाद वगळता इतर ठिकाणी शहर वाहतूक पोलिस शोधूनही सापडला नाही. शहरात लावलेल्या सीसीटीव्हीवर वॉच ठेवणाऱ्या मुख्यालयातील पोलिस पथकाने याची माहिती पोलिसांना दिली नाही का, असा सवाल वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनधारकांकडून केला जात होता. 

पश्चिम महाराष्ट्र

सुपे (नगर) पारनेर (जि. नगर) तालुक्यात आज (बुधवार) सर्वत्र पाऊसाने जोरदार हजेरी लावली. सुपे परीसरातही जोरदर पाऊस झाल्याने हंगा...

07.33 PM

पाथर्डी (नगर): विहरीवर धुणे धुत असताना विहिरीचा कठडा खचल्याने ऋृतुजा विष्णु हिंगे (वय 16 वर्षे) ही विद्यार्थ्यीनी विहरीत पडून...

07.21 PM

साडेपाच लाखाला कंपनीला ठेकेदारानेच घातला गंडा, गुन्हा दाखल श्रीगोंदे (नगर): महावितरणच्या बेलवंडी उपविभागातील गावातील वाणिज्य व...

07.03 PM