‘दिले-घेतले’ व्यवहारात; प्राध्यापक गेले कोमात  

‘दिले-घेतले’ व्यवहारात; प्राध्यापक गेले कोमात  

कोल्हापूर - मुलाचे लग्न ठरवताना वडील माहिती सांगत होते, मुलगा बीई इलेक्‍ट्राॅनिक्‍स इंजिनिअर आहे, खासगी पॉलिटेक्‍निकमध्ये चार वर्षे प्राध्यापक आहे. पाहुणे विचारतात मुलाचा पगार किती? तेव्हा वडील अडखळतात तसा पगार त्याला २५ हजार आहे; पण हातात येतो, दहा ते पंधरा हजार. पाहुणे म्हणतात म्हणजे बांधकाम मजूर ८०० रुपये दिवसा मजुरी घेतो. इंजिनिअरपेक्षा तो मजूर जास्त कमवतो. यावर वडिलांनी मान खाली घातली. अशी विदारक स्थिती काही खासगी पॉलिटेक्‍निकमधील प्राध्यापकांवर आली आहे. पॉलिटेक्‍निकमध्ये होणाऱ्या ‘दिले-घेतले’ व्यवहारात संस्था पुरेसा पगार देत नाही, मुलाला करिअर स्वस्त जगू देत नाही, अशी स्थिती प्राध्यापकांची आहे.   

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास १८ पॉलिटेक्‍निकल कॉलेज आहेत. यापैकी जवळपास निम्म्याहून अधिक संस्थामधील प्राध्यापकांना पुरेसा पगार व वेळेत दिले जातात त्यांच्या विषयी तक्रार आलेली नाही. मात्र जिल्हाभरातील आठ ते दहा संस्थामध्ये ‘दिले घेतले’ व्यवहार तेजीत आहेत. बहुतेक पॉलिटेक्‍निक मध्ये बीई, एमई, बीटेक, एमटेक असे अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले तज्ज्ञ प्राध्यापक काम करतात. येथे प्रवेश घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कमीत कमी ५७ हजारच्या आसपास वार्षिक शुल्क घेतले जाते. एका पालिटेक्‍निकमध्ये कमीत कमी ६०० ते जास्ती दीड हजार पर्यंत विद्यार्थी आहेत. यात विशिष्ट जाती वर्गातील विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क असते पण उर्वरित शुल्क समाजकल्याण विभागाकडूनही देण्यात येते. अशा पॉलिटेक्‍निक पैक्की निम्म्या पॉलिटेक्‍निकमध्ये प्राध्यापकांना पगारही चांगला व वेळेतही दिला जातो, मात्र मोजक्‍या पॉलिटेक्‍निकमध्ये होणारा ‘दिले-घेतले’ हा प्रकार जोरदार सुरू आहे. 
‘दिले घेतले पगार’ म्हणजे प्राध्यापकांची नियुक्ती करताना पगार सांगितला जातो ३५ हजार. प्रत्यक्ष नियुक्ती स्वीकारल्यानंतर काही महिने पगार व्यवस्थित होतो. त्यानंतर कागदोपत्री पगाराच्या व्हाऊचर, लेजर, स्लिपवर पूर्ण पगाराच्या रकमेवर प्राध्यपाकांच्या सह्या घेतल्या जातात. यानंतर त्यातील अर्धी रक्कम विविध कामानिमित्त कपात केल्याचे सांगून प्रत्यक्षात दहा ते पंधरा हजार रुपये मिळतील अशी सोय केली जाते, मात्र पगाराच्या कागदांवर प्राध्यापकांच्या अगोदरच सह्या घेतल्या असल्याने प्राध्यापक कुठेही तक्रार करू शकत नाही. अशा प्रकाराला ‘दिले-घेतले’ या नावाने पॉलिटेक्‍निकल वर्तुळात संबोधले जाते.

अनेक प्राध्यापक गेली पाच ते दहा वर्षे एकेका पॉलिटक्‍निकमध्ये नोकरी करीत आहेत; मात्र वेतनात अनियमितता आहे. अशा तुटपुंज्या पगारात दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न प्राध्यापकांचा असतो. 
 
‘‘जिल्ह्यातील अनेक पॉलिटेक्‍निकमध्ये ‘दिले घेतले’ व्यवहार होतात. त्यातून प्राध्यापकांना प्रत्यक्ष तुटपुंजा पगार मिळतो ही गंभीर बाब आहे. साताऱ्यातील एका पॉलिटेक्‍निकने १८० अध्यापक व कर्मचाऱ्यांची भविष्य निवार्हनिधीची रक्कमच भरलेली नाही, असा प्रकार अन्यत्र खासगी संस्थात होऊ शकतो. त्यामळे उद्या सोमवारी (ता. १०) दुपारी बारा वाजता भविष्य निर्वाह कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.’’          
 प्रा. श्रीधर वैद्य, अध्यक्ष टिचर्स असोसिएशन फॉर नॉन ॲडेड पॉलिटेक्‍निक्‍स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com