कोल्हापूरातील शास्त्रीनगर परिसरात तरुणांची दहशत

कोल्हापूरातील शास्त्रीनगर परिसरात तरुणांची दहशत

कोल्हापूर - मुलीच्या कारणावरून शास्त्रीनगर-सम्राटनगर परिसरात मंगळवारी रात्री तरुणांनी दहशत माजवली. शास्त्रीनगर आणि यादवनगर परिसरात अभिजित सावंत, संकेत मुरकुटे यांच्यात एका मुलीवरून वाद आहे. त्यांनी रात्री अकराच्या सुमारास आणि मध्यरात्री दीडच्या सुमारास हातात काठ्या, तलवारी घेऊन दहशत माजविली. काही मोटारींची मोडतोड केली. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे.

(व्हिडिआे - नितीन जाधव)

पोलिसांनी सांगितले, की काल रात्री शास्त्रीनगर आणि यादवनगर परिसरात अभिजित सावंत, संकेत मुरकुटे यांच्यात एका मुलीवरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान दहशत माजविण्यात झाले. 

संकेत शिवाजी मुरकुटे याने त्याचे साथीदार मित्र मुजबील कुरणे, शकील मुजावर, सद्दाम सत्तार मुल्ला, योगेश कोरगावे ऊर्फ दाद्या, इनाम हुसेन कुरणे, नावेद व इतर चार यांनी जमाव जमवून हातात काठ्या, गज, तलवारी, कोयते अशी घातक हत्यारे घेऊन सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या साथीदारांसह दहशत माजविली. चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड करून अंदाजे २६ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले.
अभिजित सावंत याने त्याचे साथीदार मित्र सनी सावंत, अवधूत सोमवंशी, अजिंक्‍य आरगे, रवी यादव व इतर चार जणांनी जमाव करून हातात काठ्या, गज, तलवारी घेऊन यादवनगरात 
दहशत माजवली. चारचाकी वाहनांची तोडफोड करून अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com