शेतकरी विरूद्ध सरकार असे महाभारत सुरू: रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

कोल्हापूरः शेतकरी विरूद्ध सरकार असे महाभारत आता सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे महाभारत सुरूच राहिल. कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी येत्या एक जूनपासून (गुरूवार) राज्यातील शेतकरी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली. भाजीपाला, दूघ दुभते. अंडी यासह शहराकडे जाणारा सर्वप्रकारचा कृषिमाल रोखून धरला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

एफआरपीमध्ये अडीचशे रूपयांची वाढ हा फसविण्याचा उद्योग असून, ऊसाचे क्षेत्र घटल्यानेच अडीचशेंची वाढ जाहीर करावी लागली असेही त्यांनी स्पष्ट केले.

रघुनाथ दादा म्हणाले, महाराष्ट्रात आता शेतकरी आत्महत्ता करणार नाही. तर दूसऱ्यास करण्यास भाग पाडू, कर्जमाफी, ऊसाला दूसरा हप्ता एक हजार रूपये द्या. पिकावर आधारित कर्जाची पद्धत बंद करा, निर्यातबंदी उठवा या मागण्यांसाठी शेतकरी संपावर जात आहे. मध्यंतरी पुणतांबे येथे झालेल्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय झाला होता. मात्र, संघटनेत फूट पाडल्याचा अफवा काहींनी उठविली. ऊस उत्पादकांसह सर्वच प्रकारचे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सरकार धोरण शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. एक जूनपासून सुरू होणाऱ्या संपात कोल्हापुरसह, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यातील शेतकरी संपात सहभागी होत आहेत. दुध दुभत्यासह भाजीपाला, शेतीशी संबंधित जी उत्पादने आहेत ती शहराकडे जाणार नाही. सरकार मागण्यासंबंधी ठाम भुमिका घेत नाही तोपर्यंत संप सुरूच राहिल. मध्यप्रदेश, कर्नाटकातही लोण पसरणार असून, निम्या देशातील शेतकरी संपात सहभागी होतील अशी स्थिती आहे.

पुणतांब्याच्या बैठकीवेळी संपासंबंधी चाळीस गावांनी ठराव दिले होते. दोन महिन्याच्या आत मार्ग काढू असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसे काही झाले नाही. त्यामुळे एक जूनपासून सुरू होणाऱ्या संपात सर्व संघटना सहभागी होत आहेत.