दुसऱ्या दिवशीही पावसाची हुलकावणीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत दाखल झालेला मान्सून पुढे नाहीच
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मान्सूनचे आगमन झाले असताना मृगाच्या सलग  दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात पावसाने हुलकावणीच दिली. आज तर सकाळपासून अपवाद वगळता ढगाळ वातावरण व हवेत गारवा जाणवत होता, त्यामुळे पावसाची शक्‍यता होती पण रात्री उशीरापर्यंत पावसाच्या धारा कोसळल्या नाहीत. 

यावर्षी वेळेवर व चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये काल दाखल झाला. आज गोवा ओलांडून मान्सूनने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातही हजेरी लावली. कोल्हापूर लागून असलेल्या या जिल्ह्यात पाऊस आल्याने तो पुढे सरकेल अशी शक्‍यता होती. बळीराजाचेही डोळे आकाशाकडे लागले आहेत पण पावसाने मात्र हुलकावणी दिली. 

गेल्या आठ-दहा दिवसापासून वातावरणात कमालीचा उष्मा होता. कालपासून मात्र वातावरणात बदल जाणवू लागला आहे. आज दिवसभर तर अपवाद वगळता ढगाळ वातावरण होते. हवेतही चांगलाच गारवा जाणवत होता. वाराही वाहत होता, त्यामुळे पाऊस पडेल अशी शक्‍यता होती. पण पावसाने मात्र दडीच मारली.