राजाराम साखर कारखान्याच्या सभेत खुर्च्यांची फेकाफेकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कोल्हापूर: कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्याची आज (गुरुवार) झालेली वार्षिक सभा वादळी झाली. विरोधकांचे समाधान न झाल्याने विरोधी सभासदांनी सभा संपल्यानंतर खुर्च्याची फेकाफेकी केली. यामुळे वातावरण काही काळ तंग बनले.

कारखान्यांसदर्भात विरोधकांनी 16 महत्त्वाचे प्रश्‍न विचारले होते. त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाला. पण त्याचे समाधान न झाल्याने विरोधी सभासदांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. गोंधळातच विषय मंजूर करण्यात आले. याला प्रचंड विरोध करीत आरडाओरडा सुरु झाल्याने सभा गुंडाळण्यात आली. सभा संपल्यानंतर सभासदांनी खुर्च्याची फेकफेक करुन रोष व्यक्त केला. यानंतर विरोधक सभासदांनी समांतर सभा घेतली. गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्हा दुध संघाची झालेली सभा महादेवराव महाडिक यांनी अनपेक्षितपणे गुंडाळली होती. त्यांचे विरोधक आमदार सतेज पाटील यांनी याला मोठा विरोध केला होता. या पार्श्‍वभूमीवर या दोन गटाच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ही सभा झाली.

दरम्यान कारखान्याचे को जनरेशन प्लॅन्ट वाढविण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती कारखान्याचे संचालक श्री. महाडिक यांनी दिली.