रंकाळ्यातील पाण्यात निकेलसह ऑईल, ग्रीसचे प्रमाण धोकादायक 

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - शहराच्या सौंदर्याचे महत्त्वाचे स्थान असलेल्या रंकाळा तलावातील पाण्यामध्ये जड धातूचे प्रमाण जास्त असल्याचे पुढे आले आहे. निकेल हा धातू आणि त्याचबरोबर ऑईल, ग्रीसचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. रंकाळा तलावातील पाण्यात निकेल, कॉपरसारखे धातू दिसू लागल्याने रंकाळ्याचे प्रदूषण केवळ मैला- सांडपाणी नव्हे तर अन्य घटकांमुळेही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑईल व ग्रीस सर्व्हिसिंग सेंटरमधून बाहेर पडून थेट रंकाळ्यात मिसळत असल्यामुळे तर निकेल हे बॅटरीतील पाणी किंवा बॅटरीचा कचरा याद्वारे थेट रंकाळ्यात येत असल्याची शक्‍यता आहे. चांदी व्यावसायिकांच्या दुकानातून काही घटक येत असल्याची शक्‍यता आहे. 

एक शासकीय अहवाल तयार करण्यासाठी रंकाळा पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर ही बाब समोर आली आहे. हा अहवाल अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तथापि यातील पाण्याच्या नमुन्यांचे निष्कर्ष निश्‍चितपणे धोक्‍याची घंटा देणारे आहेत. ऑक्‍टोबर 2016 ते मार्च 2017 या कालावधीत रंकाळ्यातील पाण्याची चार ठिकाणी तपासणी करण्यात आली; तेव्हा त्यामध्ये हे धातू दिसून आले आहेत. आधीच जलपर्णीच्या विळख्यात सापडलेला रंकाळा तलाव वाचवताना दमछाक होत असतानाच त्यात आता प्रशासनासमोर हे नवीन आव्हान उभे राहिले आहे. 

रंकाळा तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. पाणी प्रदूषणाचे हे प्रमाण वाढतच चालले आहे. तलावात मोठ्या प्रमाणात मैला- सांडपाणी मिसळून पाणी प्रदूषित झाले. त्यामुळे जलपर्णींचा विळखा वाढला; परंतु आता रंकाळ्यातील पाणी नमुन्यांचे पृथक्‍करण केल्यावर प्रदूषणासाठी अन्य घटकही कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे. निकेल पाण्यामध्ये सापडला आहे. निकेल हा शेतीच्या पाण्यामध्ये मिसळून तो रंकाळ्यात मिसळू शकत असल्याचे अहवालात म्हटले आहे. औद्योगिक सांडपाण्यामुळे निकेलचे प्रमाण वाढू शकत असल्याचे म्हटले आहे. एकूणच रंकाळ्यातील पाणी आता अधिकच प्रदूषित होणार असून ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज आहे. 

पाण्याच्या तपासणीतील आकडेवारी 
(ऑक्‍टोबर 2016 ते मार्च 2017 कालावधीतील मिलिग्रॅम पर लिटर) 
निकेल 
ठिकाण 
तांबट कमान 0.04 
रंकाळा खणीच्या मागे 0.36 
रंकाळा तलाव मध्यभागी 0.38 
रंकाळा टॉवर 0.404 

ऑईल आणि ग्रीस 
तांबट कमान 4.3 
रंकाळा खाणीच्या मागे 3.86 
रंकाळा तलाव मध्यभागी 4.18 
रंकाळा टॉवर 4.06