इचलकरंजीत बंद घर फोडून लाखाच्या मुद्देमालाची चोरी

राजेंद्र होळकर
मंगळवार, 29 मे 2018

इचलकरंजी - येथील प्रियदर्शनी कॉलनीतील बंद घराच्या दरवाज्याची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडून सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिणे, लॅपटॉप, घरात पार्कींग केलेली मोटरसायकल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. यांची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी - राजेंद्र उकिरडे व त्यांचे कुटूंबीय चार दिवसापूर्वी पुणे येथील नातेवाईकांच्याकडे गेले होते. याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील तिजोरी फोडून त्यामधील सोन्याची एक चेन, दोन अंगठ्या, कर्णफुले, लॅपटॉपबरोबर घरात लावलेली मोटरसायकल चोरुन नेली आहे. उकिरडे आज सकाळी घरी आले. त्यावेळी त्यांना घराच्या दरवाज्याची कडी तुटलेली दिसली. तसेच घरातील बेडरुम मधील तिजोरी फोडून त्यातील साहित्य रुममध्ये विस्कटून टाकल्याचे दिसले.

आठवड्यातील तिसरी घटना

चोरट्यांनी आठवड्याभरात तीन बंद घरे हेरुन ती फोडून, त्यातील किंमती ऐवज लंपास केला आहे. चोऱ्या झालेल्यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन तर शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एक असा तीन बंद घरात चोरी झाली आहे.

Web Title: Kolhapur News robbery incidence in Ichalkaraji