दाम्पत्यावर ॲसिड फेकून सांबरेत मंगळसूत्र लुबाडले

दाम्पत्यावर ॲसिड फेकून सांबरेत मंगळसूत्र लुबाडले

नेसरी - सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे महिलेच्या अंगावर ॲसिड टाकून मंगळसूत्र लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात संबंधित महिलेसह पतीही गंभीर जखमी झाला आहे. कलाप्पा ऊर्फ परशुराम लक्ष्मण गुरव (वय ४०) व सौ. रेणुका अशी दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी नेसरी पोलिसांनी गावातीलच अनिल ऊर्फ आनंदा रामू मणगुतकर व नारायण मारुती पाटील या दोघांना अटक केली आहे. शुक्रवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास काळामवाडी रस्त्यावर हा प्रकार घडला.

गुरव दाम्पत्य शुक्रवारी रात्री धान्य दळण्यासाठी गिरणीला आणि डेअरीला दूध घालण्यासाठी मोटारसायकलवरून गावात गेले होते. काम झाल्यानंतर दोघे घराकडे परत येत होते. मारुती आप्पा पाटील यांच्या घराजवळ संशयितांनी गुरव दाम्पत्याच्या तोंडावर, शरीरावर ॲसिड ओतले. रेणुका यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे अंदाजे बारा हजार किमतीचे मंगळसूत्र हिसडा मारून तोडले आणि पळवून नेले. गंभीर जखमी दाम्पत्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबतची फिर्याद कल्लापा गुरव यांनी दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ तपास करीत आहेत. ॲसिड ओतून मंगळसूत्र लुबाडण्याचा प्रकार नेसरी परिसरात प्रथमच घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com