कोल्हापूर: तनिष्का तर्फे चिमगाव आश्रमशाळेत शालेय साहित्य वाटप

प्रकाश तिराळे
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण : सौ.जाधव.

मुरगूड (कोल्हापूर) : ज्ञानमंदिरात मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मन, मेंदू, मनगट बळकट झाले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन तनिष्का सदस्या सौ. अनिता जाधव यांनी केले. चिमगांव (ता. कागल ) येथील शिवशंकर प्राथमिक आणि भावेश्वरी माध्यमिक आश्रमशाळेत 'सकाळ'च्या तनिष्का व्यासपीठातर्फे शालोपयोगी वस्तुचे वाटप प्रसंगी बोलत होत्या. सोनिया बोरगावे अध्यक्षस्थानी होत्या.

सौ. जाधव म्हणाल्या, 'शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांच्यात जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. यावेळी गारगोटी येथील तनिष्का सदस्या अनघा चोडणकर यांचेही भाषण झाले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक के. डी. दाभोळे यांनी केले.

यावेळी माध्यमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय. वाय. साळोखे, के. एम. लोकरे, जी. आर. पुरीबुवा, एन. एन. आंगज, आर. ए. मांगले, एस. आय. इंगवले, एच. एन. पाटील, सौ. आर. ए. पाटील, डी. एम. कांबळे, एच. पी. कांबळे, टी. पी. कुंभार, गणेश परीट आदी मान्यवर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. जे. सुतार यांनी तर आभार के. डी. दाभोळे यांनी मानले.