चार्टर्ड अकाउंटंटनी डिजिटलसह टेक्‍नॉलॉजीबबात अद्ययावत व्हावे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - "जीएसटी, रेरा अशा नवनवीन प्रणाली येत असल्याने समाजात चार्टर्ड अकाउंटंचे महत्त्व आणखीच वाढले आहे. या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांनी डिजिटल, सायबर टेक्‍नॉलॉजीसह अद्ययावत व्हावे,' असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. उचगाव येथील रजत संभाजी पोवार यांनी अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळाल्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते. राम मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. कराड अर्बन बॅंकेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

आमदार सतेज पाटील म्हणाले, ""उचगावच्या पोवार कुटुंबीयांशी गेल्या वीस वर्षांपासून माझे कौटुंबिक संबंध आहेत. खूप कष्टातून संभाजी पोवार यांनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून नावलौकिक मिळविला आहे. संभाजी पोवार व त्यांच्या पत्नी दीपा यांनी रजतला चार्टर्ड अकाउंटंट बनविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत; त्यामुळे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी रजतने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश मिळविले आहे. त्याच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबीयांचे अपार परिश्रम आहेत.'' 

यावेळी हिंद गिअर्सचे संस्थापक टी. एस. पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, विशेष लेखापरीक्षक हर्षवर्धन चव्हाण, दलितमित्र अशोकराव माने, भोगावतीचे संचालक कृष्णराव पाटील, प्राचार्य विजयकुमार घोरपडे, मानसिंग जाधव, निरंजन ठाकूर, महेश चौगुले, अनिल शिंदे, मधुकर चव्हाण, माणिक मंडलिक, डी. डी. पाटील, सेतू माधव नायर, दिलीप पाटील उपस्थित होते. दिनकर पोवार यांनी आभार मानले.

Web Title: kolhapur news satej patil