पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धोबीपछाड: सतेज पाटील

निवास चौगुले
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल काँग्रेसच्याच बाजूने असेल. सर्वसामान्य जनतेशी निगडित भाजपकडून कोणतीच कामे झालेली नाहीत. भाजपने जनतेची फक्त फसवणूक केली आहे. जागृत मतदार या सर्व गोष्टींचा विचार करून मतदान करेल.

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीतून धोबीपछाड मिळेल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल काँग्रेसच्याच बाजूने असेल. सर्वसामान्य जनतेशी निगडित भाजपकडून कोणतीच कामे झालेली नाहीत. भाजपने जनतेची फक्त फसवणूक केली आहे. जागृत मतदार या सर्व गोष्टींचा विचार करून मतदान करेल. त्यामुळे काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वासही यावेळी सतेज पाटील यांनी केला.

ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी पत्नी प्रतिमा पाटील यांच्यासोबत आपला मतदानाचा हक्क बाजावला. उजळाईवाडी मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धोबीपछाड मिळेल आणि काँग्रेसला चांगले यश मिळेल असे सांगितले.