पंधरा सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व शाळांत फुटबॉल स्पर्धा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कोल्हापूर  - सतरा वर्षाखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेनिमित्ताने होणाऱ्या महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन अंतर्गत येत्या पंधरा सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व शाळांत फुटबॉल स्पर्धा होत आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

कोल्हापूर  - सतरा वर्षाखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेनिमित्ताने होणाऱ्या महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन अंतर्गत येत्या पंधरा सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व शाळांत फुटबॉल स्पर्धा होत आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. सुभेदार म्हणाले, ""ही स्पर्धा 6 ते 24 ऑक्‍टोबर दरम्यान होत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात क्रीडा संस्कृती रूजवण्याचा ड्रीम प्रोजेक्‍ट जाहीर केला आहे. फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी व राज्यातील मुला-मुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील तीस हजार शाळेत प्रत्येकी तीन फुटबॉलप्रमाणे एक लाख फुटबॉल वाटण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत पंधरा सप्टेंबरला सकाळी आठ ते बारा या वेळेत शालेय मुला-मुलींचे संघ तयार करून स्पर्धा घेण्यात येणार आहे.'' 

ते म्हणाले, ""जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, महाराष्ट्र हायस्कूल,न्यू कॉलेज व कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशियटिव्हच्या संयुक्त विद्यमाने पंधरा सप्टेंबरला फुटबॉल स्पर्धा होत आहे. याचवेळी शुभेच्छा संदेश कार्ड तयार करण्यासह निबंध, चित्रकला स्पर्धा होणार आहे. सकाळी आठ वाजता त्याचे महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर आयोजन केले आहे. पोलो मैदानावर 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान चौदा वर्षाखालील मुला-मुलींच्या सेव्हन साईड स्पर्धा होत आहे. स्पर्धेसाठी विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून पंचवीस हजार रोख बक्षीसे व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेतून मुला व मुलींच्या संघातून दोन उदयोन्मुख खेळाडू निवडण्यात येणार आहेत. स्पर्धेत चाळीस संघ सहभागी होतील.'' 

अहवाल पाठवावा लागणार.. 
जे विद्यार्थी फुटबॉल खेळणार नाहीत, त्यांनी फिफामध्ये सहभागी हाणाऱ्या संघांसाठी शुभेच्छा संदेश कार्ड तयार करावयाचे आहे. त्याचबरोबर निबंध, चित्रकला स्पर्धेत त्यानीं सहभाग घ्यायचा आहे. तसेच फुटबॉल खेळाशी संबंधित अन्य उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे. पंधरा सप्टेंबरला किती विद्यार्थी प्रत्यक्ष मैदानावर खेळले, याचा अहवाल (फोटो/व्हिडिओ) जिल्हा क्रीडाधिकारी यांना dsokop@gmail.com व खास दुतातर्फे maharashtrafootball@gmail.com मुख्याध्यापक, प्राचार्यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठविण्याचे आवाहन केले आहे. 

Web Title: kolhapur news school Football tournament