‘भाजपविरोधात काँग्रेसची भूमिका वेगळी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - ‘देशपातळीवर भाजपविरोधात पक्ष एकत्र येत असताना काँग्रेसची मात्र वेगळी भूमिका दिसत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात केली. गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे अहमद पटेल हे ‘राष्ट्रवादी’मुळेच विजयी झाले, असा दावाही पवार यांनी या वेळी केला. 

ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

‘देशात भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र असताना राष्ट्रवादीची भूमिका काय असेल?’ या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘‘देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र आहेत; पण यामध्ये अधूनमधून काँग्रेस पक्ष काहीतरी वेगळी भूमिका घेत आहे. उदाहरणार्थ गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीची दोन मते आहेत. त्यापैकी एकाने मी पक्षाचा आदेश मानणार नाही, माझ्यावर कारवाई करा, असे स्पष्ट सांगितले होते; पण दुसऱ्या उमेदवाराने या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना मतदान केले. त्या एका मतामुळेच पटेल विजयी झाले. सर्व विरोधकांनी एकत्र यावे या भूमिकेतून आम्ही काम करतो. सर्वांनी एकत्र काम करावे.’’

एन. डीं.च्या प्रकृतीची विचारपूस
ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांच्या प्रकृतीची आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारपूस केली. या वेळी त्यांच्यासाबेत ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार होते. प्रकृती साथ देत नसल्याने डॉ. पाटील सध्या घरीच आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांना भेटण्यासाठी शरद पवार, त्यांचे बंधू प्रतापराव पवार दुपारी डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले. डॉ. पाटील यांच्या पत्नी व पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.