श्रवणबेळगोळ येथे उद्या तब्बल सहा कि. मी. ची निघणार मिरवणूक

संजय खूळ
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

इचलकरंजी - श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (ता. १६) स्वागत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तब्बल ६ किलोमीटरची ही मिरवणूक असणार असून, ४ हजारांहून अधिक स्वयंसेवक सोनेरी रथ, पालखी, हत्ती, घोडे असा भव्य लवाजमा यामध्ये असणार आहे. आजपर्यंतच्या मिरवणुकीतील ही मिरवणूक ऐतिहासिक अशी ठरणार आहे.

इचलकरंजी - श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (ता. १६) स्वागत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तब्बल ६ किलोमीटरची ही मिरवणूक असणार असून, ४ हजारांहून अधिक स्वयंसेवक सोनेरी रथ, पालखी, हत्ती, घोडे असा भव्य लवाजमा यामध्ये असणार आहे. आजपर्यंतच्या मिरवणुकीतील ही मिरवणूक ऐतिहासिक अशी ठरणार आहे.

दर बारा वर्षांनी होणारा महामस्तकाभिषेक सोहळा येत्या शनिवारपासून (ता.१७) सुरू होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या भव्य महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी सुमारे ५० लाख भाविकांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी स्वागत मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत अग्रभागी सोनेरी रथ असणार आहे. त्यानंतर एक चांदीचा रथ, जैन धर्मातील २४ तीर्थंणकरांचे २४ पालख्या, ५०० मंगल कलश घेतलेल्या महिला, १०२ कला सादर करणारे पथके या मिरवणुकीत असणार आहेत. याचबरोबर प्रभावना रथ, पंचवाद्य, २२५० पंचरंगी ध्वज आणि ५०० एका रंगाचे ध्वज घेऊन स्वयंसेवक यामध्ये सहभागी होणार आहेत. तब्बल ६ किलोमीटर लांबीची ही मिरवणूक पाहण्यासाठी २ लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांनी दिली.

पंतप्रधान, राहुल गांधींची उपस्थिती
महोत्सवासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी रविवारी (ता. १८) उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी येणार आहेत. प्रशासनाच्या अंदाजानुसार श्री. मोदी हेलिकॅप्टरमधून महामस्तकाभिषेकवेळी पुष्पवृष्टी करणार आहेत, तर भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा २५ फेब्रुवारीला येणार आहेत, अशी माहिती सुरेश पाटील यांनी दिली. 

महोत्सवासाठी देशभरातून तब्बल २ हजार स्वयंसेवक काम करत आहेत. यामध्ये सर्वाधिक स्वयंसेवक वीर सेवा दलाचे ५००, महिला मंडळाचे २०० स्वयंसेवकांचा समावेश आहे. शिवाय चंदाबाबा ग्रुप, सन्मती संस्कार मंचचे स्वयंसेवकही सहभागी झाले आहेत. स्वयंसेवक महानिर्देशक सागर चौगुले, अरविंद मजलेकर, अजित भंडे, बाबासो हुपरे, सुरेश मगदूम, बबन थोटे हे संयोजन करीत आहेत.

Web Title: Kolhapur News Sharvanbelghol Mahamastakabhishekh sohala

टॅग्स