रेडीरेकनर ठरवताना सूक्ष्म पद्धत वापरा - शांतिलाल कटारिया

रेडीरेकनर ठरवताना सूक्ष्म पद्धत वापरा - शांतिलाल कटारिया

कोल्हापूर - ‘लॅन्ड टायटल’ प्रक्रिया तातडीने करा, रेडीरेकनर ठरवताना सूक्ष्म पद्धत वापरा, महिलांच्या नावे फ्लॅट असल्यास त्यांचा टॅक्‍स रद्द करण्याची तरतूद बजेटमध्ये करा, अशा मागण्या क्रेडाई महाराष्ट्र शासनाकडे करण्यात येत आहेत. रेरासह इतर कायद्यांत स्पष्टता झाल्यामुळे पुढील शंभर दिवसांत रिअल इस्टेटला सुगीचे दिवस येतील, असाही विश्‍वास महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी येथे पत्रकार परिषदेत दाखविला.

बांधकाम व्यवसायाबाबत बोलताना कटारिया म्हणाले, ‘‘रेरा या बांधकामविषयक कायद्यात राज्यातील १३ हजार ७०० क्रेडाई सभासदांनी रजिस्ट्रेशन केले. साडेचारशे रजिस्ट्रेशनचे काम सुरू आहे. रेरा, जीएसटीनंतर आता बांधकाम व्यावसायिक स्थिरावला आहे. फसवणूक होणार नाही, याची खात्री ग्राहकांना मिळाली. तीन वर्षांत बांधकाम पूर्ण करावे लागेल. जागा मिळताच जाहिरात करून चालणार नाही. राज्य शासन आता प्रत्येक जमिनीचे ‘लॅन्ड टायटल’ पूर्ण करणार आहे. ज्या जागा ‘लिटिगेशन’ शिवाय आहेत, त्यांची माहिती संबंधित मालकाला मिळेल. 

ज्या जागांमध्ये ‘लिटिगेशन’ आहे, त्यात प्रकल्प होणार नाहीत, ही जमेची बाजू आहे. राजस्थानसह इतर राज्यांत महिलांच्या नावे घर-फ्लॅट केल्यास करांत सवलत दिली. स्टॅम्प ड्यूटी माफ आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आखावी, अशी मागणी आहे. वार्षिक १८ लाख उत्पन्न असलेल्या कुटुंबीयांना या योजनेत सहभागी होता येईल,’’ असेही कटारिया यांनी स्पष्ट केले. या वेळी राज्य उपाध्यक्ष राजीव परीख, क्रेडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव, उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव के. पी. खोत उपस्थित होते.

तक्रार निवारण केंद्रात संपर्क साधा
गृह प्रकल्पांत ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांच्यावर तोडगा काढण्यासाठी ग्राहक पंचायत आणि जिल्हा क्रेडाई यांच्यात चर्चा करून तोडगा काढता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण केंद्र आहे. तेथे सर्वांनी संपर्क साधावा, असेही आवाहन कटारिया यांनी पत्रकार परिषदेत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com