आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेसाठी सहा वैज्ञानिकांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

कोल्हापूर - चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेसाठी शिवाजी विद्यापीठातील सहा वैज्ञानिकांची निवड झाली आहे. प्रा. डॉ. एस. आर. यादव, डॉ. उषा यादव, डॉ. विनोद शिंपले, डॉ. नीता जाधव, डॉ. अरुण चांदोरे, डॉ. शरद कांबळे यांचा यात समावेश आहे. परिषदेत जगभरातील सहा हजारांहून अधिक वनस्पतीतज्ज्ञ भाग घेणार आहेत. वनस्पतींचे वर्गीकरण, नामकरण व त्याचे नियम निश्‍चित करण्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते. परिषदेची सुरुवात 1885 पासून झाली असून, आजतागायत 28 परिषदा झाल्या आहेत. विद्यापीठातील सहा वैज्ञानिक व विद्यार्थी यंदा होत असलेल्या परिषदेत शोधनिबंध सादर करणार आहेत. त्यांना कुलगुरू डॉ.

कोल्हापूर - चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेसाठी शिवाजी विद्यापीठातील सहा वैज्ञानिकांची निवड झाली आहे. प्रा. डॉ. एस. आर. यादव, डॉ. उषा यादव, डॉ. विनोद शिंपले, डॉ. नीता जाधव, डॉ. अरुण चांदोरे, डॉ. शरद कांबळे यांचा यात समावेश आहे. परिषदेत जगभरातील सहा हजारांहून अधिक वनस्पतीतज्ज्ञ भाग घेणार आहेत. वनस्पतींचे वर्गीकरण, नामकरण व त्याचे नियम निश्‍चित करण्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते. परिषदेची सुरुवात 1885 पासून झाली असून, आजतागायत 28 परिषदा झाल्या आहेत. विद्यापीठातील सहा वैज्ञानिक व विद्यार्थी यंदा होत असलेल्या परिषदेत शोधनिबंध सादर करणार आहेत. त्यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचे प्रोत्साहन मिळाले.