मल्लांच्या थकीत मानधनाचा प्रश्‍नी शिवसेनेचे आंदोलन

मल्लांच्या थकीत मानधनाचा प्रश्‍नी शिवसेनेचे आंदोलन

कोल्हापूर - मल्लांच्या थकीत मानधनापोटी शिवसेनेने आज जिल्हा क्रीडा कार्यालयाला टाळे ठोकले. कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टाळे लावण्यास भाग पाडले गेले.

कोल्हापूर ही कुस्तीचे माहेर मानले जाते. अनेक नामवंत मल्ल नगरीने महाराष्ट्राला दिले. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, दिनानाथसिंह, दिवंगत मारूती माने, हरिश्‍चंद्र बिराजदार,दादू चौगुलेै, हिंदकेसरी विनोद चौगुले, योगेश दोडके, अमोल बराटे, अमोल बुचडे असे मल्ल महाराष्ट्राच्या मातीत घडले. सहा महिन्यापासून त्यांचे महिन्याला सहा हजार या प्रमाणे सुमारे दोन लाखापर्यंत मानधन थकीत आहे. 

राज्याच्या क्रीडा विभागाकडून मानधन दिले जाते. हे मल्ल नावारूपाला होते त्यावेळी आर्थिक स्थिती चांगली होती. उतारवयात याच मल्लांना मानधनासाठी ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. मानधन नेमके का थकले याचा जाब विचारण्यासाठी जिल्हा शिवसेनेने आज सकाळी टाळे ठोक आंदोलन केले. शिवाजी स्टेडीयममध्ये असलेल्या क्रीडा कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. कर्मचाऱ्यांस टाळे लावण्यास भाग पाडले गेले.

अधिकाऱ्यांनी खुलाश्‍याचा प्रयत्न केला; मात्र शिवसेना कार्यकर्त्यांचा समाधान झाले नाही. क्रीडा प्रबोधिनीत तरूण मल्ल सराव करतात. त्यांनी कोणता आदर्श घ्यायचा. या वेळी क्रीडा विभागाच्या कारभारा विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवाजी स्टेडीयमची दुरवस्था झाली आहे. रात्री ओल्या पार्ट्या रंगतात. त्याकडे दुर्लक्ष आहे. जलतरण तलावाची दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यात आले. मानधन सोडण्यात तांत्रिक त्रुटी आहेत त्या दूर करून कार्यवाहीचे आश्‍वासन दिल्यानंतर टाळे काढण्यात आले, 

जिल्हाप्रमूख संजय पवार, विजय देवणे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दुर्गेश लिंग्रस, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, राजेंद्र पाटील, रणजित आयरेकर, दिलीप देसाई, धनाजी यादव, भगवान कदम, अमित कांबळे, दिपक कानडे, प्रतीक क्षीरसागर, चंदू भोसले सहभागी झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com