कोल्हापूर शिवसेना शहरप्रमुखासह पाचजणांवर गुन्हा

कोल्हापूर शिवसेना शहरप्रमुखासह पाचजणांवर गुन्हा

उंब्रज -  कल्याण जनता सहकारी बॅंकेच्या कोल्हापूर येथील शाखाधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी कोल्हापूर येथील शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांना उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह सुमारे पाच जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र आनंदराव मोहिते (वय ४५, रा. कोरिवळे) असे आत्महत्या केलेल्या शाखाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पुतण्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॅंकेच्या कोल्हापूर शाखेतील एका महिला कर्मचाऱ्याने बॅंकेची रक्कम लॉकरमध्ये न जमा करता तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. त्याबाबत शाखाधिकारी मोहिते यांनी ताकीद देऊन तिचा माफीनामा घेतला होता. त्या कारणावरून मोहिते यांना महिला कर्मचारी, तिचा पती, सासू, सासरे, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपमानास्पद वागणूक, मारहाण, शिवीगाळ केली होती. त्याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

याप्रकरणी पाच जणांवर पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे. बॅंकेतील महिला कर्मचारी दीपाली लगारे, पती स्वरूप, शिवसेनेचे कोल्हापूर शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, महिला कर्मचाऱ्याचे सासू, सासरे (नाव समजू शकले नाही, सर्व रा. राजारामपुरी, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांना काल (शनिवारी) रात्री आठच्या सुमारास उंब्रज येथील शुभम पेट्रोल पंपालगत राजेंद्र मोहिते यांचा मृतदेह आढळला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com