पाणीदार अर्जुनवाड्यासाठी तरूणाई सरसावली 

प्रकाश कोकितकर
रविवार, 27 मे 2018

सेनापती कापशी - आठशे फूट खोलीवर जाऊनही कुपनलिका खोदाताना पाणी लागले नाही. याचा कारणावरून दुसऱ्या दिवशी गुडमॉर्निंग ग्रुपच्या तरुणांनी पहाटे पाच वाजता उठून डोंगर गाठला आणि अर्जुनवाडा (ता. कागल) गाव पाणीदार करण्याचा उपक्रम सुरु झाला. तीन दिवसात 6 बंधारे आणि 8 समतल चरी काढून गावाला पाण्यासाठी साद दिली.

जमिनीत पाणी जिरवण्याची वेळ आली आहे. हाच ध्यास घेतलेल्या तरुणांनी कामाला सुरवात केली. पहिल्यादिवशी केवळ 9, दुसऱ्या दिवशी 25, तिसऱ्या दिवशी 30 अशी श्रमदान करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पहाटे उठायचे आणि थेट डोंगर गाठायचा, कुदळ, फावडे, पाट्या असे मिळेत ते साहित्य घेवून काम सुरु करायचे ते साडे सात वाजे पर्यंत चालते. तीन दिवसात डोंगर उतारावरील जमिनीवर दगडी बांध आणि समतल चरी आकार घेत आहेत. येथे होणारे शाश्वत काम पाहून जेष्ठ नागरिकही सहभागी होत आहेत.

कामावेळी होणाऱ्या चेष्टा, विनोदामुळे ताणविरहीत काम होत आहे. हत्यारांना धार नसतानाही तक्रार केली जात नाही. उद्या प्रत्येकाने आणखी तीनजण वाढवा. असा संदेश दिला जातो. 

दरम्यान, गावात श्रमदानातून भविष्य बदललेल्या गावांच्या व्हीडीओ क्‍लिप दाखवून ग्रामस्थांना प्रोत्साहित केले जात आहे. कृषि खाते व ग्रामसेवक संघटनांनीही मनावर घेतले आहे. तेही सहभाग येथे नोंदविणार आहेत. 

पाऊस सुरु होईपर्यंत सुमारे 100 चरी आणि ओघळ, नाल्यावर 60 दगडी बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. श्रमदानासाठी तरुणांचा उत्साह आहे. त्यात सर्वच वयोगटातील लोक सहभागी होत आहेत. आवश्‍यक तेथे "जेसीबी'ने जलसंधारणाचे काम करण्यासाठी लोकवर्गणीचाही आधार घेण्यात येणार आहे. 
- प्रदीप पाटील,
सरपंच 

Web Title: Kolhapur News social work by Arjuwada youths