भाजप-सेना वादात एसटीचे त्रांगडे - भाई जगताप

शिवाजी यादव
शुक्रवार, 1 जून 2018

कोल्हापूर - ‘‘राज्य सरकारने एसटी महामंडळाला देणे असलेले दीड-दोन हजार कोटी रुपये जरी दिले, तरी एसटी महामंडळ नव्या गाड्या घेऊ शकते. मात्र, भारतीय जनता पक्ष-शिवसेना वादाचे त्रांगडे झाले. त्यात मुख्यमंत्री काही करीत नाहीत, भाजपप्रणित सरकार एसटी व प्रवाशांच्या हिताचे हाल करते. या विरोधात सर्व संघटनांना एल्गार पुकारावा लागेल,’’ असे परखड मत एसटी कर्मचारी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.  

‘एसटी महामंडळाने स्वतःच्या ५०० शिवशाही गाड्या व खासगी कंपनीकडून एक हजार ५०० शिवशाही गाड्या घेतल्या. एसटीचा महसूल खासगी कंपनीला जातो. एसटी कर्मचाऱ्यांना खासगीकरणाची भीती वाटते, या विषयी ‘सकाळ’मधून वृृत्तमाला प्रसिद्ध झाली. याविषयी श्री. जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘एसटी कामगार करार मुदत संपून दोन वर्षे झाली, तरी नवीन करार केला नाही. वेतनवाढ दिली नाही. 
अल्प पगारावर कर्मचारी राबतात. त्यांच्या वेतनवाढीसाठीची दिरंगाई होत आहे.’’

ते म्हणाले, की एसटीने खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या चालवायला घेणे म्हणजे खासगीकरणाचे पाऊल आहे, असे आम्ही सुरवातीपासून म्हटले, ते बहुतांश खरे ठरले. खासगीकरणवर एसटी कर्मचारी नाराज आहेत. याचे कारण भाजप-शिवसेना मुद्यांवरून भांडत आहेत. त्यामुळे निर्णय प्रलंबित राहिला आहे. यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मिळून एकत्र येऊन एल्गार उठविला पाहिजे, तरच सरकारला जाग येईल. आमची संघटनाही त्यात सहभागी असेल.      

Web Title: Kolhapur News ST issue