विविध मागण्याबात राज्यातील मुद्रांक विक्रेते बेमुदत संपावर

प्रकाश तिराळे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला : जिल्ह्यातील कार्यालये पडली ओस

मुरगूड (कोल्हापूर): व्यवसायातील विविध मागण्याबाबत राज्य शासनाने वेलकाढू पणाचे धोरण अवलंबले आहे. शासकीय पातळीवर मागण्यांचा कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळे आज पासून राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी शासनाच्या तिजोरीत जमा होणारा लाखो रुपयांचा महसूल आज बुडाला आहे. तर खरेदी-विक्री व अन्य तत्सम कामेच नसल्याने जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये ओस पडली.

महाराष्ट्र राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी व दस्तलेखनिकांनी राज्यात प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांक विक्रेत्यांना 10 % मनौती मिळावी, राज्यात सुरु असलेली ई चलन तसेच इ-एस.बी.आर.टी हि प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांचे मार्फतच राबविण्यात यावी. या.एस.पी.हि प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच मिळावी, मयत मुद्रांक विकेत्यांचे वारस हक्काने परतावा मिळावा यासह अन्य आपल्या विविध मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता.28 फेब्रुवारी 2017 रोजी राज्याचे महसूल मंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत देवगिरी मुद्रांक विक्रेता दस्तलेखक संघटना औरंगाबाद या संघटनेच्या पदाधिकाऱ्याना या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण त्यांनतर शासन पातळीवर अद्यापही या मागण्याबाबत कोणताही विचार झाला नाही. त्यामुळे मुद्रांक विक्रेते दस्तलेखनिक यांचे मानसिक खच्चीकरण झाले असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते दस्तलेखनिक सामुदायिक बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे मुद्रांक विक्री, दस्तलेखन व ई चलन बनविणे यासारखी कामे बंद झाली आहेत. याचा फटका शेतकरी बांधवांना आज मोठ्या प्रमाणावर बसला. ज्यांची खरेदी-विक्री व्यवहार होते. त्यांना ती रद्द करावी लागली.काहींची बँक कर्ज प्रकरणाचे मोर्गेस करता आले नाही. दिवाळीच्या तोंडावरच हा संप झाल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक यांच्यासह अन्य घटकांनाही याचा फटका बसला आहे. या सर्वामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडाला आहे. जिल्ह्यातील अनेक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला.

मुरगूडमध्ये सरकार विरोधी घोषणा...
दरम्यान आजपासून सूरु झालेल्या बेमुदत संपात मुरगुडमधील सर्व मुद्रांक विक्रेते दस्तलेखनिक सहभागी झाले. त्यांनी कामकाज बंद ठेवून येथील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर ठिय्या मारला. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. अशा सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यामध्ये बाबुराव डावरे, शिवाजी वारके, अरुण ढोले, नामदेव पाटील, संदिप सुर्यवंशी, सुभाष शेट्टी, गोविंद म्हाळुंकर, रविनाथ संकपाळ, युवराज साठे आदींचा सहभाग होता.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :