नेटकं अन्‌ दमदार ‘इथॉस’

नेटकं अन्‌ दमदार ‘इथॉस’

इचलकरंजीच्या पदन्यास कला अकादमीनं यंदाच्या स्पर्धेत राजेंद्र पोळलिखित ‘इथॉस’चा नेटका आणि दमदार प्रयोग सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

दिग्दर्शक अभिजित फाटक आणि त्यांच्या या टीमनं अगदी तळमळीने प्रयोग सादर केला. दरम्यान, स्पर्धा आता सांगतेकडे निघाली असून, शेवटच्या चार प्रयोगांनंतर सर्वांची निकालाची उत्सुकता ताणली जाणार आहे.

मुळात यंदाच्या स्पर्धेत जुन्या संहितांसह काही नव्या दमाच्या लेखकांचे प्रयोगही सादर झाले. एकूणच स्पर्धा कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिक मायबाप प्रेक्षकांच्या तिन्ही पिढ्यांना बरेच काही शिकायला मिळणारी एक प्रयोगशाळाच ठरते आहे. ‘पदन्यास’चं ‘इथॉस’ नैतिकता आणि अनैतिकता यांतील संघर्षावर बेतलेलं. टॉरिसिस हा नीतिमत्तेचं प्रतीक मानला जाणारा. त्याची मुलगी आर्टिया ही सुंदरतेची देवता मानली जात असते. मात्र प्रधान ओरानची आर्टियावर वाईट नजर. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर नाटकाची कथा पुढे सरकते. समाजात काही नाती जन्माला येतात, तर काही निर्माण होतात. 

त्यांतील परस्पर संबंध हे विश्‍वास आणि नैतिकतेच्या बळावरच दृढ होत राहतात. नात्यांची ही वीण घट्ट होताना किंवा सुटत जाताना कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आणि त्यातून त्याची होणारी घालमेल आणि एकूणच नैतिक आणि अनैतिक नात्यांबाबत विविध प्रश्‍न उपस्थित होतात. ‘टॉरिसिस’, ‘ओरान’, ‘आर्टिया’सह सर्वच भूमिका प्रयोगाला अधिक प्रभावीपणे सादर करण्यासाठी पूरक. बाकी तांत्रिक बाजूही उत्तम. 

पात्र परिचय
 प्रतीक जाधव (टॉरिसिस), अनिरुद्ध भागवत (ओरान), श्रद्धा फाटक (आर्टिया), रमाकांत मेस्त्री (पीलास), प्रसन्न देशमुख (मेनलास), ओंकार चौगुले (सिमॉन).
  दिग्दर्शक- अभिजित फाटक
  नेपथ्य- प्रताप डांगरे
 पार्श्‍वसंगीत- सलमान मोमीन
  प्रकाशयोजना- आनंद ढमगणे
  वेशभूषा- सुनीता वर्मा
 रंगभूषा- प्रसाद गद्रे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com