डॉ. सा. रे. पाटील स्मृती कथा स्पर्धांचा निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

शिरोळ -  येथील साहित्य सहयोग दिवाळी अंक व त्रैमासिक इंद्रधनुष्य यांच्यातर्फे झालेल्या स्व. डॉ. सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धांचा निकाल जाहीर झाला.

शिरोळ -  येथील साहित्य सहयोग दिवाळी अंक व त्रैमासिक इंद्रधनुष्य यांच्यातर्फे झालेल्या स्व. डॉ. सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धांचा निकाल जाहीर झाला.

यात कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील अनंत चंदनशिवे यांच्या ‘शाहिरी अभंग गाते’ कथेला प्रथम क्रमांकाचे ५ हजारांचे पारितोषिक मिळाले. द्वितीय क्रमांक विभागून दिला, यात कुरुंदवाडच्या साहिल शेख यांची ‘म्हातारी मेलीच, काळ सोकावला’ ही कथा आणि मुंबईच्या नीलेश माळवणकर यांची ‘प्रत्येकाचे आरमान’ यांचा समावेश आहे.

‘सकाळ’चे उपसंपादक सर्जेराव नावले ‘यांच्या बालिंग्याचं काळं’ कथेला व संतोष नारायण पाटील (मुमेवाडी, ता. आजरा) यांच्या ‘मुलूख’ कथेला तृतीय क्रमांक विभागून दिला. सुषमा माने-गावडे (पोशिंदा), विजया बन्ने (वाघीण), आरती गावडे (माऊली) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले.