इचलकरंजीत किराणा व्यापाऱ्याची आत्महत्या

इचलकरंजीत किराणा व्यापाऱ्याची आत्महत्या

इचलकरंजी - येथील षट्कोण चौकातील एका किराणा व्यापाऱ्याने आज पहाटे घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.  गजानन सिध्दाप्पा मिठारी असे आत्महत्या केलेल्या किराणा व्यापाराचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्यापी समजले नाही.

व्यापारी गजानन मिठारी हे रात्री जेवून घराच्या माडीवरील खोलीमध्ये झोपण्यास गेले होते. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याची मुलगी त्यांना उठविण्यासाठी खोलीकडे गेली होती. त्यावेळी तिला वडीलांनी खोलीच्या लोंखडी अँगला दोरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. हे पाहुन तिने केलेला आरडा-ओरड ऐकून तिचे घरचे व शेजारील नागरीकानी खोलीकडे धाव घेतली.

व्यापारी श्री. मिठारी यांना त्वरीत आयजीएम रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. पण त्यांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यु झाल्याचे आयजीएम रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारानी सांगितले. व्यापारी मिठारी यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच रुग्णालयात षटकोन चौकातील नागरिक व किराणा व्यापाऱ्यानी गर्दी केली होती. या घटनेची शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com