स्थलांतरितांच्या शिक्षणासाठी आवाज उठवू - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - ‘‘रोजगारासाठी अनेक कुटुंबे परराज्यातून स्थलांतरित होतात. त्यांची मुले इथल्या शाळा, महाविद्यालयांत शिक्षण घेतात. मात्र त्यांना सरकारच्या योजना, सवलतींचा लाभ घेता येत नाही. याच विषयावर संसदेमध्ये मी व खासदार धनंजय महाडिक आवाज उठवू.’’ असे आश्‍वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी शाहू महाविद्यालयात झालेल्या युवा संवादात बोलताना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे युवा संवाद यात्रा सुरू आहे. त्याअंतर्गत राजर्षी शाहू महाविद्यालयात युवक-युवतींशी सुळे यांचा संवाद कार्यक्रम रंगला.

‘तुमच्याकडे हुंडा घेतला जातो का?’ असा प्रश्‍न श्रीमती सुळे यांनी मुलींना विचारला. तेव्हा अनेकींनी हो, नाही, अशी उत्तरे दिली. तेव्हा सुळे यांनी, ‘हुंडा घेणे व देणे चुकीचे आहे. हुंडा घ्यायचा नाही, याविषयी जागरूक राहा, पालकांनाही जागरूक करा’, असा सल्ला दिला.

स्त्री-भ्रूणहत्या होतात का? असाही प्रश्‍न सुळे यांनी विचारला तेव्हा अनेक मुलींनी हो, नाही अशी उत्तरे देताच ‘मुलगी जन्माला आली पाहिजे, स्त्री-भ्रूणहत्येचे प्रकार घडता कामा नयेत, यासाठी दक्ष राहा,’ असे सांगितले. एका मुलीने विचारले, ‘ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, अशांना शिक्षणात आरक्षणाचा लाभ मिळाला पहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. असे का?’ यावर सुळे म्हणाल्या, ‘आम्ही आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण द्यावे, जो आर्थिकदृष्ट्या गरजू आहे, त्याला प्राधान्याने आरक्षणाचा लाभ द्यावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत’. असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजर झाला.

राजकारणीच मध्यस्थ 
एका युवकाने छेडछाडीवर थेट प्रश्‍न केला. ‘‘छेडछाड करणाऱ्या तरुणांना अनेकदा पोलिस घेऊन जातात. पण राजकीय नेतेच त्यांना सोडवून आणतात. तेव्हा छेडछाड वाढते, असे का घडते ?’’ या प्रश्‍नावर सारेच अवाक्‌ झाले. तेव्हा सुळे म्हणाल्या, ‘‘माझ्या मतदारसंघात असे प्रयत्न कदापि होत नाही. तसे घडले तर हे तुम्ही पुराव्यानिशी दाखवावे.’’

Web Title: kolhapur news supriya sule speech in yuva sanvad programm