हातकणंगलेत वेटरचा स्वाईन फ्लूने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - स्वाईन फ्लूने आज जिल्ह्यात 26 व्या रुग्णाचा मृत्यू झाला. वेटर आनंदसिंह ऊर्फ बाबा माधवसिंह राठोड (वय 60, रा. हॉटेल यश, हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. न्यूमोनियामुळे सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्यामध्येच त्याची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे दुपारी त्यांचा मृत्यू झाला. 

जानेवारी 2017 पासून आजअखेर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने 26 बळी गेले. आजही शहरातील सहा महत्वाच्या रुग्णालयात 32 जणांवर उपचार सुरू आहेत. राठोड हातकणंगले परिसरातील हॉटेल यशमध्ये काम करीत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारात त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले होते. उपचार सुरू असताना त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. आज सकाळी त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि दुपारी त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी त्यांच्यावर हातकणंगले येथे अंत्यसंस्कार झाले. ते मुळचे परप्रांतिय असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. 

दरम्यान जिल्ह्यातील हा 26वा बळी आहे. एक जानेवारी पासून तब्बल 305 रुग्णांना स्वाईन फ्लू संशयित म्हणून रुग्णालयात दाखल झाले. त्यापैकी 145जणांचे चाचणी पॉझिटीव्ह आली. आजही शहरातील महत्वाच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात 32 रुग्ण उपचार घेत असल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून आले आहे.