बदली से नही डर नहीं लगता साहब...! 

राजेंद्र पाटील
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - शासनाच्या नवीन धोरणानुसार होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा विषय शिक्षण क्षेत्रात गेल्या चार-पाच महिन्यांपासून चर्चेत आहे. या बदली धोरणावर सोशल मिडीयातून दररोज चारोळी, वात्रटिका, कविता, विडंबन अशा भरघोस पोस्ट पडत आहेत. 

कोल्हापूर - शासनाच्या नवीन धोरणानुसार होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा विषय शिक्षण क्षेत्रात गेल्या चार-पाच महिन्यांपासून चर्चेत आहे. या बदली धोरणावर सोशल मिडीयातून दररोज चारोळी, वात्रटिका, कविता, विडंबन अशा भरघोस पोस्ट पडत आहेत. 

जिल्हा परिषद शाळातील प्राथमिक शिक्षकाच्या बदल्या ग्रामविकास विभागामार्फत होतात. यापूर्वी ग्रामविकास विभागाचे सचिव कोण याची माहितीही अनेक शिक्षकांना नसायची पण सध्या नवीन बदली धोरण राबविणारे ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांचेच नाव प्रत्येक शिक्षकांच्या तोंडी आहे. आपली बदली नेमकी कुठे होईल हे माहित नसल्याने शिक्षक हवालदिल झाले आहेत. यातूनच अनेकजण सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत. 

बदलीसाठी माहिती पोर्टलवर ऑनलाईन भरावी लागत आहे, शिवाय दोन तीन दिवसातून एक तरी आदेश ग्रामविकास विभागातून येतो यावर लिहीलेय, 

बदली से डर नहीं लगता साहब, पोर्टलसे लगता है, यह खौफनाक वेटींग और असीमजी के रोज के फतवे साला हर पल मौत लगती है साहब... 

जालना जिल्ह्यातील शिक्षक शिरीष देशमुख यांनी विडंबन काव्य लिहीलेय 
सांग सांग भोलानाथ, बदली टळेल काय 
सोपी सोडून अवघडातली शाळा मिळेल काय? 
भोलानाथ म्हणशील तर उपासतापास करीन 
खो न द्यावा कुणी म्हणून पाय तुझे धरीन 

केवळ बदलांकडे शिक्षकांचे लक्ष लागल्याने यावर लिहीले आहे, 
बदलीच्या वेलीवर लगडली 
काही अवघड,काही सोपी फुले 
शिकविण्याचे विसरून सर्व महाराष्ट्र बदली पोष्टवर डुले. 

बदलीने शिक्षकांचा आनंद हिरावून घेतला आहे त्याबाबत लिहीले आहे की, 
आनंदी आनंद गडे, बदलीच बदली चोहिकडे 
डोंगरावर, दऱ्याखोऱ्यात बदली मिळे 

एका शिक्षकाने लिहीलेय... 

माझ्या मना बन दगड 
ही बदली अटळ आहे 
जीआर फक्त घोळ आहे 
रस्त्यावरची सोयीची 
शाळा आता तू सोड 
ठरवलंय पक्क त्यांनी 
आपली मोडायची खोड 
कनिष्ठांच्या कोणत्याही 
दहा वीस शाळा निवड 
माझ्या मना बन दगड 

सरल वागणं हुकूम पाळणं 
काही चांगल्या सवयी सोड 
चालत्या गाडीला खीळ घालण्याची 
शासनाला आहे खोड 

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सोनू गाण्याच्या चालीवर एकाने लिहीलेय, 

गुरुजीऽऽऽ, तुला बदलीवर भरोसा नाय का...नाय का! 
झेडपी ला करायच्याय बदल्या...बदल्या 
बदलीची प्रोसेस कशी लांब लांब... लांब लांब 
त्यात "सरल' म्हणते थांब थांब...थांब थांब 
"सरल'ची साईट फिरते गोल गोल...गोल गोल 
गुरुजी तू माझ्या संग गोड बोल... 

बदलीचा जीआर कसा अवघड...अवघड 
अवघडचं होणारय सोपं... सोपं 
आता सोप्यांना फिरावं लागेल गोल...गोल 
गुरुजी तू माझ्य संग गोड बोल...गोड बोल 

Web Title: kolhapur news teacher