शिक्षक बदली प्रक्रिया सुरू 

राजेंद्र पाटील
सोमवार, 19 जून 2017

कोल्हापूर - बदली धोरणात सुधारणा करावी, यासाठी राज्यभरात शिक्षक संघटनांनी मोर्चे काढले. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. अशा स्थितीतही राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेस सुरवात केली आहे. 

विशेष संवर्ग भाग एकमधील शिक्षकांनी 21 जूनअखेर बदलीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे शिक्षक संघटना व ग्रामविकास विभाग यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्‍यता आहे. 

केवळ शिक्षकांसाठी शासनाने या वर्षी बदल्यांचे नवीन धोरण आखले आहे. सर्वसाधारण व अवघड या दोन क्षेत्रानुसार बदल्या करण्यात येणार आहेत. यास राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रपणे विरोध केला. विविध जिल्ह्यांतील हजारो शिक्षकांनी उच्च न्यायालयात बदली विरोधी याचिका दाखल केल्या आहेत. याचिकांची सुनावणीही पूर्ण झालेली नाही. प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना शिक्षकांनी भेटून बदली धोरणात सुधारणा करण्याची मागणी केली. 

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना अनेकवेळा साकडे घातले; मात्र त्यात शिक्षक नेत्यांना यश आलेले नाही. अशा स्थितीतच बदली प्रक्रिया सुरू आहे. विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमध्ये पक्षाघाताने आजारी असलेले, अपंग, हृदय शस्त्रक्रिया, कर्करोग झालेले, आजी-माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा, कुमारिका, घटस्फोटीत महिला, वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षकांचा समावेश आहे. या संवर्गातील शिक्षकांनी मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आदेश दिला आहे. आता शिक्षक संघटना काय भूमिका घेतात. यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. 

यावर्षी राज्यस्तरावरून संगणकीय प्रणालीद्वारे हजारों प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या. स्वतःच्या गावापासून शेकडो-हजारों किलोमीटर अंतरावर नोकरी करणाऱ्या शिक्षकांच्या स्वतःच्या जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. आठवडाभरात हे शिक्षक आपापल्या जिल्ह्यात हजर होतील. परंतु, त्यांची नियुक्ती जिल्ह्यात जाहीर केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळेत करावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षे दूर ठिकाणी नोकरी केलेल्या शिक्षकांची स्वतःच्या जिल्ह्यातील नोकरीची वाट अवघडच ठरणार आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षकांत पुन्हा नाराजी पसरली आहे. शासनाच्या नवीन बदली धोरणाने शिक्षण क्षेत्रात मोठे फेरबदल होणार आहेत. 

बदली अर्ज लॉगीन करण्यात अडचण 
विशेष संवर्ग एकमधील शिक्षकांनी edustaff.mahashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तेथील ट्रान्सफर पोर्टलवर मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनचा वापर करून बदलीचे ऑनलाईन अर्ज 17 ते 21 जून या काळात भरण्यास सांगितले आहे. परंतु, शनिवारी व रविवारी लॉगीन झाले नाही. वेबसाईटच्या तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस वाया गेल्याने शिक्षक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.