आजपासून होणार ‘पीऽऽऽ ढबाक’चा गजर..!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

कोल्हापूर - आषाढातील ‘पीऽऽऽ ढबाक’चा गजर आता सुरू होणार असून उद्या (ता. ७) पासून या सोहळ्याला सर्वत्र प्रारंभ होणार आहे. 

मात्र, मंगळवार (ता.१८) पासूनच बहुतांश गल्ल्यांत खरी रंगत येणार आहे. दरम्यान, सोहळ्यासाठी टेंबलाई टेकडी सज्ज झाली असून शहरात सर्वत्र डिजीटल फलक उभारले आहेत. दोनशे ते तीनशे रूपयांत यंदा वाटा मिळणार आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आषाढी म्हाईंची लगबग सुरू झाली आहे. म्हाईला ग्रामदैवतांसह प्रत्येक मंदिरात नैवैद्य दिला जातो. शहरात नदीचे नवे पाणी त्र्यंबोली देवीला अर्पण करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. यंदा दोन मंगळवार आणि तीन शुक्रवारी हा सोहळा साजरा होणार आहे. त्यासाठी ‘पी-ढबाक’ या पारंपरिक वाद्यांवरच सर्व तालीम संस्था भर देणार आहेत. दरम्यान, नारळ आणि विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या उदबत्त्या (झाडे) बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत.

टॅग्स