गुजरात निवडणुकीकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष 

गुजरात निवडणुकीकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष 

इचलकरंजी - सध्या देशभर गुजरात निवडणुकीचीच चर्चा जास्त रंगली आहे. या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याची उत्सुकता वाढत आहे. त्याचप्रमाणे येथील वस्त्रोद्योगाचेही या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. या निवडणूक निकालानंतर कापडाला मागणी वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प असलेल्या वस्त्रोद्योगाला "अच्छे दिन' येतील, अशी आशा आहे. 

गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या देशपातळीवर होत आहे. येथील वस्त्रोद्योगाचेही या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटीमुळे वस्त्रोद्योग ठप्प आहे. सूतदरात वाढ झाल्यानंतर कापडाला मागणी येत असते; पण सूतदरात भरमसाट वाढ होऊनही कापडाला मागणी नाही. त्यामुळे यंत्रमाग उद्योजक हवालदिल आहेत. कापडाला मागणी कधी येणार, या प्रतीक्षेत येथील यंत्रमाग उद्योजक आहेत. 

नोटाबंदी आणि जीएसटीप्रमाणे गुजरात निवडणुकीचाही वस्त्रोद्योगावर परिणाम झाला आहे. देशातील अहमदाबाद आणि सुरत ही मोठी वस्त्रोद्योगाची केंद्रे आहेत. सध्या गुजरात निवडणुकीची मोठी धामधूम सुरू आहे. या निवडणुकीमध्ये व्यापारी वर्ग गुंतला आहे. त्यामुळे कापड खरेदी ठप्प झाली आहे. त्यामुळे सूतदरात वाढ होऊनही कापडाला मागणी येत नसल्याचे वस्त्रोद्योगातील जाणकारांतून सांगण्यात आले. 

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर थोडा कालावधी गेल्यावर वस्त्रोद्योगातील ठप्प झालेले व्यवहार पूर्ववत होतील, अशी शक्‍यता आहे. त्यामुळे साधारणपणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कापडाला मागणी वाढण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे नजीकच्या काळात वस्त्रोद्योगाला "अच्छे दिन' येतील, अशी आशा निर्माण झाली आहे. 

मुळात इचलकरंजीत उत्पादित होणारे सर्व प्रकारचे कापड सर्वाधिक अहमदाबादला जाते. त्याच बरोबर सूरत येथे कापड उत्पादित होत असले तरी इचलकरंजीत उत्पादित होत असलेले सूताचे कापड तेथे मोठ्या प्रमाणात जाते. मात्र, सध्या निवडणूक प्रक्रियेमध्ये तेथील कापड व्यापारी गुंतल्याने कापड खरेदीचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे निवडणूक निकालानंतर पुन्हा वस्त्रोद्योग सुरळीत होईल, अशी आशा आहे. कापडाला मागणी आल्यानंतर हळूहळू वस्त्रोद्योगाला तेजीची चाहूल लागण्याची शक्‍यता दिसत आहे. 
 

वस्त्रोद्योगावर गुजरात निवडणुकीचा नक्की परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कापडाला मागणी नसल्यामुळे यंत्रमाग उद्योजक हवालदिल झाले आहेत. निवडणूक निकालानंतर कापड खरेदीला गती येऊन मागणी वाढेल, अशी आशा आहे. 
- विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना, इचलकरंजी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com