टवंडी घाटामध्ये अपघात: कोल्हापूरच्या दोन वकिलांसह तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

कोल्हापूर : न्यायालयाचे काम आटपून आजऱ्याहून कोल्हापुरला येत असताना स्तवनिधी (टवंडी) घाटात हिटणी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर येथील दोन वकिलांचा समावेश आहे.

कोल्हापूर : न्यायालयाचे काम आटपून आजऱ्याहून कोल्हापुरला येत असताना स्तवनिधी (टवंडी) घाटात हिटणी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर येथील दोन वकिलांचा समावेश आहे.

कोल्हापूर येथील अॅडव्होकेट जावेद मुल्ला (वय ४७, रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर), अॅडव्होकेट देवानंद वाघमारे (रा. कोल्हापूर) आणि त्यांचे अशील चंद्रकांत श्रीपती पाटील (पन्हाळा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अॅडव्होकेट जावेद मुल्ला व अन्य दोन असे आजरा येथे न्यायालयात कामासाठी गेले होते. कोल्हापूरकडे येत असताना संकेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील हिटनी गावाजवळत त्यांच्या मोटारीचा अपघात होऊन मुल्ला, वाघमारे आणि पाटील (पन्हाळा) यांचे जागीच मृत्यू झाले आहे. मुल्ला हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात फौजदारी वकील म्हणून काम करत होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात 
दुर्दैवी अनिता अन्‌ तमीळ अस्मिता...!
धुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक
एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू
मानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन
भाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले
'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट