तिलारी घाट बुधवारपासून महिनाभर बंद

तिलारी घाट बुधवारपासून महिनाभर बंद

चंदगड - तिलारी घाटाची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम बुधवार (ता. 22) पासून सुरू होणार आहे. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बुधवारपासून 21 डिसेंबरपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या येथील कार्यालयाने पत्रकातून ही माहिती दिली आहे. 

हा 189 क्रमांकाचा राज्य मार्ग आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह बेळगाव परिसरांतील नागरिकांना कोकण व गोव्याला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा पडतो. तीव्र उतार आणि अवघड वळणे असलेल्या तिलारी घाटाची लांबी 7.2 किलोमीटर असून रुंदी साडेसहा मीटर आहे. डांबरी पृष्ठभाग 5.50 मीटर रुंदीचा असून अनेक वर्षे दुरुस्ती न केल्याने खराब झाला आहे. तीव्र चढ आणि उतार असून वळणे कमी त्रिज्येची आहेत. रस्त्याच्या एका बाजूला दरी असल्याने अर्ध्या भागात काम सुरू ठेवून अर्ध्या भागातून वाहतूक सुरू ठेवायची म्हटली तर ते अत्यंत धोकादायक आहे. वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवून रस्त्याची दुरुस्ती करून मजबुतीकरण करावे लागणार आहे.

या मार्गावरील वाहतूक चंदगड, आंबोली, सावंतवाडीमार्गे दोडामार्ग, पणजी अशी वळवण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com