धान्य व्यापाऱ्यास मारहाण करून लुटले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - धान्य व्यापाऱ्यास साळोखेनगर-कळंबा रस्त्यावर रात्री दहा वाजता अडवून मारहाण करून लाख रुपयांना लुटले. याबाबतची फिर्याद संजय जीवंधर हुक्केरी (शिवशक्ती हायस्कूल, कळंबा रोड, साळोखेनगर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. 

कोल्हापूर - धान्य व्यापाऱ्यास साळोखेनगर-कळंबा रस्त्यावर रात्री दहा वाजता अडवून मारहाण करून लाख रुपयांना लुटले. याबाबतची फिर्याद संजय जीवंधर हुक्केरी (शिवशक्ती हायस्कूल, कळंबा रोड, साळोखेनगर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. 

पोलिसांकडून तसेच फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय हुक्केरी ग्राहक तक्रार निवारणचे काम करतात. त्यांचे स्वतःचे धान्य दुकान आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. तेथून ते मोपेडवरून घरी चालले होते. साळोखेनगर रस्त्यावर असताना त्यांना रात्री दहाच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी थांबविले. मदतीच्या बहाण्याने त्यांना मोपेडवरून खाली उतरण्यास भाग पाडले. त्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना जबर मारहाण केली. त्यांना रस्त्यावरच टाकून मोपेडची डिकी उघडली.

धान्य दुकानातील रोख रक्कम, वायफाय राऊटरसह इतर कागदपत्रे घेऊन चौघांनी तेथून पळ काढला. यानंतर हुक्केरी यांनी जखमी अवस्थेतच जुना राजवाडा पोलिस ठाणे गाठले. काही पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. हुक्केरी यांनी सांगितले की, संशयित २४-२५ वयोगटातील आहेत. साधारण पाच-साडेपाच फूट उंच होते. एकाने फिक्कट चॉकलेटी टी शर्ट, राखाडी रंगाची पॅंट घातली होती. इतरांच्या अंगात चौकटा निळसर शर्ट, निळी जिन्स पॅन्ट होती. पोलिसांनी कच्चा जबाब लिहून घेतला. सहायक पोलिस निरीक्षक दराडे तपास करीत आहेत.

तपासाच्या नावाखाली पहाटेपर्यंत फिरविले
हुक्केरी यांनी लुटारूंचे वर्णन सांगितल्यावर पोलिसांनी तपासाच्या नावाखाली त्यांना पहाटेपर्यंत फिरवले; मात्र त्यांची साधी वैद्यकीय तपासणी केली नाही. त्यांनी एफआयआर नोंद करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर पोलिसांनी एकत्रित लूट केल्याची नोंद करून घेतली.