उद्दीष्ठ पूर्तीच्या घाईत उपायांची वाणवा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

कोल्हापूर - नैसर्गिक समृद्धया वाढावी, यासाठी वनविभागाच्या सहयोगाने 4 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे; मात्र यासाठीचे उद्दीष्ठ पूर्ण करण्यासाठी दिलेले मापदंड अनेक पातळ्यांवर अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे नेमके स्पष्टीकरण न दिल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्ष लागवडीचा फार्स होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

कोल्हापूर - नैसर्गिक समृद्धया वाढावी, यासाठी वनविभागाच्या सहयोगाने 4 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येत आहे; मात्र यासाठीचे उद्दीष्ठ पूर्ण करण्यासाठी दिलेले मापदंड अनेक पातळ्यांवर अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे नेमके स्पष्टीकरण न दिल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्ष लागवडीचा फार्स होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

जिल्हाभरात जवळपास साडे आठ लाख वृक्ष लागवड होईल, असा अंदाज आहे. सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या पुढाकाराने वृक्ष लागवड केली जाते. त्यासाठी वनरक्षक वनपालांनी लावलेल्या वृक्षाच्या नोंदी दर 3 महिन्यांनी घ्यावी, त्याचे वृक्ष निरीक्षण करून त्यांचा वरिष्ठांकडे अहवाल देणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी पहिल्या 2-3 टप्प्यात अशा नोंदी घेतल्या गेल्या. त्यात अनेक ठिकाणी झाडे जगली असल्याचे संदर्भ जरूर आहेत; मात्र बहुतांशी ठिकाणची झाले कांही दिवसातच मोकाट गुरांनी, वाहनांची धडक बसून किंवा मानवी वर्दळीतून तुटल्याचेही उघड झाले. त्यानंतर रोपांना तयार कुंपन करण्याचा पर्याय पुढे आला. तो काही संस्था संघटनांनी स्वखर्चातून राबविला; मात्र सगळीकडे तसे कुंपन लावणे, त्यासाठी खर्च कोणी करावा असे प्रश्‍न पुढे आला. ज्या झाडाना कुंपन नाही अशी 50 टक्‍क्‍या पेक्षा अधिक झाडे लागवडीनंतर काही कालावधीत नामशेष झाली आहेत. अनेक ठिकाणीनंतर पाणी घालण्यासाठी कोणीच फिरकलेले नाही. त्यामुळे झाडे वाळून गेली असे चित्र दिसते. या साऱ्यावर नेमक्‍या उपाय योजना काय केल्या याचा कोणताच मुद्दा वनविभागाकडून समोर आलेला नाही. अशात नवीन वृक्षलागवड मोहीम सुरू होत आहे. 

यंदाच्या मोहिमेसाठी जिल्हाभरातील सर्व ग्रामपंचायंतीना प्रत्येकी 200 वृक्ष लागवड करण्यास सांगितले आहे जिल्हाभरात 1800 च्या वर ग्रामपंचायती आहेत. जवळपास तीन लाख वृक्ष लागवड येथून होईल, असे गणित असावे; मात्र त्यासाठी जवळपास 60 टक्के ग्रामपंचायतींकडे अवती-भोवती जागा शिल्लक नाही. त्यामुळे 200 झाडे लावलीत कोठे हा प्रश्‍न आहे. काही ग्रामपंचायंतीना उर्वरीत झाडे गावातील गायरान किंवा मोकळ्या जागेवर लावण्याचा पर्याय आहे; मात्र तशा स्पष्ट सूचना नसल्याने ग्रामपंचायतींच्या आवारात झाडे लावण्यावर भर राहील्यास दोन झाडे एकमेकांना खेटूनच लावावी लागतील. परिणामी झाडांची वाढ पूर्ण होईल की नाही, या विषयी शंका आहेत. जर ग्राम पंचायतीनी झाडे इतर जागेवर लावायची झाल्यास इतर सहकारी संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांनी झाडे कोठे लावावीत, असाही प्रश्‍न पुढे आला. अशा संभ्रमात वृक्ष लागवड मोहीम राबवयाची आहे. 

मोहीम केवळ औपचारिकता ठरू नये 
शासकीय निर्सरीतून 6 ते 11 रूपयांना काही वृक्ष मिळणार आहेत. यात जांभळ व आंबा झाडांचा समावेश आहे घरात आंबा खाऊन कोयी टाकली तरी झाडे येऊ शकते. जांभळाचे बीया टाकूनही झाड येऊ शकते; मात्र दुर्मिळ झाडाळची लागवड कोठे करावी याचे वर्गिकरण दिलेले नाही. त्यामुळे कोणाच्या मनाला येईल ती झाडे, कुठे जागा दिसले तेथे लागवड, अशी दिशा मोहीमचा असेल की काय अशी शंका आहे. याशिवाय जागा, लागवड केलेली वृक्ष जतन होण्यासाठी उपाय योजना आणि सर्वसमावेशक सहभाग झाडांचे वर्गिकरण याबाबत योग्य ते नियोजन होणे आवश्‍यक आहे. या अनुषंगाने मोहीम राबविल्यास या लागवडीचे फलित चांगले असणारआहे. अन्यथा दरवर्षी प्रमाणेच औपचारीकता ठरू नये, अशी अपेक्षा विविध स्तरातून व्यक्त होत आहे.