कोल्हापूर: ट्रक चोरीचा चार तासात लावला छडा

बाळासाहेब कांबळे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

शिरोळ जयसिंगपुर रस्त्यावरील दत्त सहकारी साखर कारखान्या समोरील पेट्रोल पंपाजवळ उभा असलेला सहा चाकी ट्रक (एमएच १० झेड १३८१) मंगळवारी रात्री सातच्या सुमारास अज्ञातांनी चोरुन नेला.

हुपरी (जि. कोल्हापुर) : शिरोळ येथे झालेल्या सहा चाकी ट्रकच्या चोरीचा हुपरी पोलिसांनी अवघ्या चार तासात छडा लावून ट्रक ताब्यात घेतला.

शिरोळ जयसिंगपुर रस्त्यावरील दत्त सहकारी साखर कारखान्या समोरील पेट्रोल पंपाजवळ उभा असलेला सहा चाकी ट्रक (एमएच १० झेड १३८१) मंगळवारी रात्री सातच्या सुमारास अज्ञातांनी चोरुन नेला.

याबाबतची फिर्याद ट्रकचे मालक सुनील तानाजी पवार (रा. कसबे डिग्रज, जि. सांगली) यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात दिली. याबाबतची माहिती मिळताच हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी कर्मचार्‍यांसह नाकाबंदी केली असता ट्रक जवाहर साखर कारखान्याजवळ आढळून आला. हुपरी पोलिसांनी तातडीने कार्यवाही केल्याने अवघ्या काही तासातच ट्रक चोरीचा छडा लागला.