तुळशी धरण ओव्हर फ्लो 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

धामोड -  येथील तुळशी धरण आज पूर्ण क्षमतेने भरल्याने तीनही दरवाजे उघडण्यात आले आहेत. 200 क्‍युसेसने तुळशी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून, हा जलाशय आजतागत 24 वेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे.

धामोड -  येथील तुळशी धरण आज पूर्ण क्षमतेने भरल्याने तीनही दरवाजे उघडण्यात आले आहेत. 200 क्‍युसेसने तुळशी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून, हा जलाशय आजतागत 24 वेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे.

गतवर्षी या जलाशयात 1.43 टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक होता. या वर्षी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात 2.04 टी.एम.सी. इतका पाणीसाठा झाला. केळोशी लघुपाटबंधारे प्रकल्पातून 1.56 द. ल. घ. फूट इतका पाण्याचा विसर्ग उजव्या कालव्यातून आल्याने जलाशय पूर्ण क्षमतने भरला. गतवर्षी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात 2732 मि. मी. पावसाची नोंद झाली होती. या वेळी 1738 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी एक वाजता 616.91 द. ल. घ. फूट इतकी जलाशयाची पाणीपातळी झाली. त्यामुळे प्रशासनाने जलाशयाच्या तीनही दरवाजांतून 200 क्‍युसेसने विसर्ग नदीत सोडला आहे. गतवेळी जलाशय 24 ऑगस्टला भरला होता, तर या वर्षी 25 ऑगस्टला भरल्याची माहिती शाखा अभियंता शिवाजीराव कळके यांनी दिली.